Home /News /national /

बंडखोर आमदारांचं मुंबईत जंगी स्वागत, आरे कारशेडला मनसेचा विरोध, पुणेकरांना अलर्ट TOP बातम्या

बंडखोर आमदारांचं मुंबईत जंगी स्वागत, आरे कारशेडला मनसेचा विरोध, पुणेकरांना अलर्ट TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 3 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shiv Sena Rebel MLAs) मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची मुंबईतील नामांकित ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये (Mumbai Taj Hotel) सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आता शिंदे गट आणि भाजपची परीक्षा असणार आहे. बहुमत चाचणी आणि अध्यक्ष निवड या दोन महत्वाच्या गोष्टी आता पार पडणार आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. ताज हॉटेलमध्ये नेमकी खलबतं काय? EXCLUSIVE माहिती समोर शिवसेना आणि बंडखोर आमदारांची आज मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉचेलमध्ये बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना संबोधन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. फुल जल्लोषात भाजपकडून आमदारांचं स्वागत शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shiv Sena Rebel MLAs) मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची मुंबईतील नामांकित अशा फाईव्ह स्टार ताजच प्रेसिडेंट हॉटेलमध्ये (Mumbai Taj Hotel) सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. एकनाथ शिंदेंचा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार मुंबईसाठी रवाना झाले आहे. पुढील काही वेळात ते मुंबई विमानतळावर दाखल होतील. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आलं आहे. हे तिघे हरयाणा आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेनेच्या व्हीपला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्व आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी लागू असणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या व्हीपला विरोध केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध मेट्रोचं कारशेड हे आरे कॉलनीतच (Aarey Clooney) बनावं यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. पण आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. विशेषत: मनसेचे तरुण तडफदार नेते अमित ठाकरे यांचादेखील विरोध आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. परवा आणि तेरवा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर यानंतर आता पुण्याबाबतही हवामान खात्याने पावसाचा (IMD on Pune Rain) अंदाज वर्तवला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Rain

    पुढील बातम्या