बंगळुरू 11 जुलै : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आज हाय होल्टेज ड्रामा झाला. काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामे सोपवावे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. सायंकाळी 6 वाजताच्या आत हे राजीनामे प्रत्यक्ष जावून द्यावे असंही कोर्टानं म्हटलं होतं. त्यासाठी आमदार 6 वाजताच्या आधी काही मिनिटं कर्नाटक विधानसभेच्या आवारात दाखल झाले आणि धावतच जात त्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन आपले राजीनामे सोपवले. आमदारांच्या या धावण्याची जोरदार चर्चा रंगली सोशल मीडियावर होतेय.
काँग्रेस आणि जेडीएसचे 14 बंडखोर आमदार गेले काही दिवस मुंबईत वास्तव्याला आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे ते कडेकोट बंदोबस्तात मुंबईवरून बंगळुरूला रवाना झाले. या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने खास व्यवस्था केली होती. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पाच नेत्यांची टीमही तयार केली होती.
VIDEO तृणमुलच्या खासदाराने संसदेच्या आवारात खेळला 'फुटबॉल',PMना दिला हा सल्ला
तर काँग्रेसचे नेते डी.के. शीवकुमार यांनीही या आमदारांना गळाला लावण्याची पूर्ण फिल्डिंग केली होती. विमानतळावरून एका खास बसने या आमदारांना वेळ संपण्याच्या थोडं आधी विधानभवनाच्या आवारात आणण्यात आलं वेळ चुकू नये म्हणून अनेक आमदार धावतच अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये घुसले.
अध्यक्ष के.आर. रमेशकुमार यांनी सर्व आमदारांचे राजीनामे मिळाल्याचं सांगितलं. रात्रभर विचार करून या राजीनाम्यावर निर्णय देणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे शुक्रवारी अध्यक्ष काय निर्णय देतात यावर कुमारस्वामी सरकारचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.
#WATCH: Rebel Congress MLA Byrathi Basavaraj runs into the Speaker's office in Vidhana Soudha, Bengaluru. #Karnataka pic.twitter.com/L6zrzPqCub
— ANI (@ANI) July 11, 2019
'जय श्रीराम' म्हटलं म्हणून शिक्षिकेने मुलाला दिला मार
काँग्रेस नेत्यापासून जीवाला धोका
काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,' असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले होते. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.
'शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही' असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदारा रेनिसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाटी आलेल्या डीके शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं होतं.