गुजरात : दोन काँग्रेस आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी, राहुल गांधींवर गंभीर आरोप

गुजरात : दोन काँग्रेस आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी, राहुल गांधींवर गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केलाय.

  • Share this:

गांधानगर 5 जुलै : गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी पोटनिवडणूक होतेय. काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी व्हिपही जारी केला होता. मात्र पक्षाचा हा व्हिप धूडकावत काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपला मतदान केलं आणि पक्षाचा राजीनामा दिला. अल्पेश ठाकोर आणि धवन झाला अशी या दोन आमदारांची नावं आहेत. राहुल गांधी यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केलाय.

मी माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून मतदान केलंय. जो पक्ष देशाचा विकास करू शकतो अशा पक्षाच्या बाजूने आपण आहेत असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून अल्पेश हे काँग्रेसमध्ये नाराज होते. राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षात सन्मान नाही. वारंवार अपमानीत व्हावं लागतं अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली.  ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

Union Budget 2019 : इलेक्ट्रिक कार घ्या; कर्जात सुट मिळवा !

अल्पेश ठाकोर यांनी 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अल्पेश ठाकोर राधानपूरमध्ये जिंकले. त्यांनी भाजपच्या लाविंगजी ठाकोर यांचा पराभव केला होता. अल्पेश यांना  77 हजार मतं तर भाजपच्या उमेदवाराला 63 हजार मतं  मिळाली होती.

Union Budget 2019 : पेट्रोल, डिझेल आणि सोनंही झालं महाग

अल्पेश हे गुजरातमधील मागासवर्ग नेता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जवळजवळ 50 टक्के मतदार मागासवर्गीय आहेत. त्यामुळे या वर्गाचा नेता कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचा आहे. गुजरात ओबीसी एकता मंचचे संयोजक ठाकोर यांचा मागासवर्गावर प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी राज्यात अमली पदार्थांविरोधात लढा दिलाय. ते दारूबंदीच्या बाजूचे आहेत. अल्पेश यांनी पाटीदारांना आरक्षण देण्याचा विरोध केला. त्याला समांतर आंदोलनही उभे केले आहे.

First published: July 5, 2019, 6:13 PM IST

ताज्या बातम्या