गेल्या वर्षीच्या मे महिन्यातदेखील बंगळुरूमध्ये असाच जोरदार आवाज नागरिकांनी अनुभवला होता. त्यावेळी त्याचं कारणही स्पष्ट करण्यात आलं होतं. सुरक्षा विभागाकडून एका विमानाची चाचणी सुरू होती, त्यामुळे हे आवाज आल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा तशाच प्रकारचे धमाकेदार आवाज बंगळुरूत घुमले. या स्फोटांचं कारण काय? गेल्या वर्षीच्या आवाजामागे विमानाच्या टेस्टिंगचं कारण असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र या ताज्या आवाजांमागे नेमकं काय कारण आहे, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आपल्याकडून गेल्या वर्षीसारखा किंवा इतर कुठलाही प्रयोग केला गेलेला नाही, असं एचएएल (Hindustan Aeronautical Limited) कंपनीनं स्पष्ट केलं आहे. Sonic Boom ची चर्चा हा आवाज Sonic Boom चा म्हणजेच अंतराळातून आलेला असावा, असं बंगळुरूतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बंगळुरू शहरात असा आवाज येण्यासारखी कुठल्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सर्व पोलीस स्थानकांना याविषयी माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आतापर्यंत अशी कुठलीही स्फोटाची घटना शहरात घडल्याची माहिती मिळालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘तेजस’च्या आगमनाची तयारी? बंगळुरूमध्ये लवकरच तेजस विमानांचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. लवकरच तेजस विमानांची पहिली खेप बंगळुरूत दाखल होणार असून एचएएल त्याच्या तयारीत व्यस्त असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. कदाचित, त्याच्याशी संबंधित हा आवाज असावा, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र एचएएलकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. हे वाचा - खासदार प्रज्ञा सिंह व्हिलचेअर सोडून मैदानात, बास्केटबॉल खेळतानाचा Video Viral HAL ची प्रतिक्रिया विमानांचं टेकऑफ आणि लँडिंग ही रोजच सुरु असणारी प्रक्रिया आजही सुरु आहे. शुक्रवारी नवं आणि वेगळं काहीच घडलेलं नसल्याचं एचएएलनं म्हटलंय. त्यामुळं हा आवाज कसला होता, याबाबत एचएएल काहीच भाष्य करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एचएएलच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.Karnataka | A loud sound heard in many parts of Bengaluru around 1215 hours today, details awaited
— ANI (@ANI) July 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.