• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भुतानं झपाटलेलं रेल्वे स्टेशन, 42 वर्षांत थांबली नाही एकही ट्रेन

भुतानं झपाटलेलं रेल्वे स्टेशन, 42 वर्षांत थांबली नाही एकही ट्रेन

भारतातील एक रेल्वे स्टेशन (Reality of the haunted railway station in West Bengal) भुतानं झपाटलेलं असल्याची अफवा पसरल्यामुळे या स्टेशनवर तब्बल 42 वर्षं एकही रेल्वे थांबली नाही.

 • Share this:
  कोलकाता, 8 नोव्हेंबर: भारतातील एक रेल्वे स्टेशन (Reality of the haunted railway station in West Bengal) भुतानं झपाटलेलं असल्याची अफवा पसरल्यामुळे या स्टेशनवर तब्बल 42 वर्षं एकही रेल्वे थांबली नाही. जगात अशी अऩेक ठिकाणं आहेत, जी (Train did not stop here for 42 years) भुतानं झपाटलेली असल्याचा दावा कऱण्यात येतो. कधीतरी कुणाला काही विचित्र अनुभव येतो आणि त्यानंतर ती आख्यायिक बनून जाते. भारतातदेखील अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांच्याशी भुताखेतांच्या कथा जोडल्या जातात. काही ठिकाणी जायला लोकं घाबरतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये असं एक रेल्वे स्टेशन आहे, जिथं जायला प्रशासनदेखील घाबरतं. भुताटकीचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील बेगनुकोडोर रेल्वे स्टेशनवर भूत असल्याचा समज गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक बाळगून होते. भारतीय रेल्वेच्या रेकॉर्डमध्ये भुतांचा संशय असलेले 10 रेल्वे स्टेशन्स नोंदवले गेले आहेत. त्यात या रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. 1967 साली या रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी करत असताना स्टेशन मास्तरांना भूत दिसल्याचं सांगितलं जातं. रेल्वेच्या ट्रॅकवर पांढऱ्या साडीतील एक भूत दिसल्यामुळे स्टेशन मास्तर घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा त्या स्टेशनवर कुणीच फिरकलं नव्हतं. रेल्वे खात्यानंही या स्टेशनवर गाड्या थांबवणं बंद केलं. या स्टेशनवर कुणीही प्रवासी चढत किंवा उतरत नव्हता. या स्टेशनवरून गाड्या जायच्या, मात्र अजिबात थांबायच्या नाहीत. हे वाचा- Pune : नवरा नपुंसक असल्याचं तरुणीने केलं जगजाहीर; शेवटी पोलिसांकडून कारवाई ममता बॅनर्जींनी बदललं चित्र ममता बॅनर्जी या 2009 साली रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी हे रेल्वे स्टेशन पुन्हा कार्यरत केलं. त्यानंतर हळूहळू प्रवासी इथं येऊ लागले. मात्र तरीदेखील तिथं काही भीतीदायक घटना आणि गुन्हे घडत असत. त्यासाठी पोलिसांनी गस्त घालून परिस्थितीचं निरीक्षण केलं. त्यावेळी काही समाजकंटक मध्यरात्रीच्या सुमाराला येऊन मुद्दाम त्रास देत असल्याचं आणि अफवा पसरवत असल्याचं लक्षात आलं. आता या रेल्वे स्टेशनकडं पाहण्याची नागरिकांची दृष्टी बदलली आहे. मात्र अजूनही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तिथं कुणीही येत नाही. संध्याकाळी या रेल्वे स्टेशनवर अजूनही रेल्वे थांबत नसल्याचं सांगितलं जातं.
  Published by:desk news
  First published: