लडाखमधील भारतीय जवानांना 8 वर्षांपासून मदत करतोय हा Real Hero; वाचा त्याची थरारक कहाणी

दशकभराच्या कार्यकाळात अनेक मृत सैनिक आणि सहकारी पोलिसांचे मृतदेहही बर्फातून बाहेर काढले आहेत.

दशकभराच्या कार्यकाळात अनेक मृत सैनिक आणि सहकारी पोलिसांचे मृतदेहही बर्फातून बाहेर काढले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : तापमान उणे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेल्या 22,000 फूट उंचीवर सियाचीन ग्लेशियर येथे देशाच्या सीमेचे रक्षण करणे भारतीय सैन्यासाठी (Indian Army) सोपे काम नाही. परंतु, न्युब्रा व्हॅलीच्या सुंदर परिसरातील आसपासच्या गावांमधील स्थानिक रहिवाशांच्या मदतीने भारतीय लष्कराचं काम थोडं सोपं होतं. स्थानिक रहिवाशांना पोर्टर म्हणून नोकरी देण्यात येते, जे सियाचीन ग्लेशियरवर सैन्याच्या चौकीपर्यंत 20 किलोग्रॅम सामान नेतात आणि आवश्यक त्या त्या वस्तू पोहोचवून तिथला साठा मजबूत करतात. तसंच रॉकेलचा साठा राखत असतात. ग्लेशियरवर चढण्यात सैनिकांना मदत करण्यासाठी ते दोर आणि शिडी लावण्याचं काम करतात आणि बर्फही खोदतात. अशाच एका 31 वर्षांच्या पोर्टरचं नाव आहे स्टॅन्झिन पद्मा, ज्यानी फक्त भारतीय लष्कराच्या दोन जवानांना वाचवलं नाही तर आपल्या दशकभराच्या कार्यकाळात अनेक मृत सैनिक आणि सहकारी पोलिसांचे मृतदेहही बर्फातून बाहेर काढले आहेत. 2014 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांकडून स्टॅन्झिनला जीवन रक्षा पदक मिळालं आहे. स्वत: ला गंभीर दुखापत झालेली असतानाही सहकाऱ्याचा जीव वाचवण्याचं धैर्य दाखवत जीवाची बाजी लावणाऱ्या व्यक्तीला हे पदक दिलं जातं. त्याचा जन्म लडाखच्या नुब्रा व्हॅलीमधील पनमिकच्या गरम पाण्याच्या कुंडाजवळील फुकपॉय गावात झाला. एका शेतकाऱ्याच्या घरात वाढलेल्या, स्टॅन्झिनने 14 वर्षांपूर्वी लेहमधील जवाहर नवोदय विद्यालयातून आपले हायस्कूल शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने 2006 मध्ये सियाचीन येथे भारतीय सैन्यासाठी पार्ट-टाइम पोर्टर म्हणून काम सुरु केलं, तसेच मारखा व्हॅली आणि झांस्कर येथे जाणाऱ्या ट्रेकर्ससाठी त्याने टुरिस्ट गाईड म्हणूनही काम केले. त्याचे पालक शेतकरी असले तरी त्याचे वडील कधीकधी सियाचीनमध्ये पोर्टर म्हणूनही काम करायचे. बेटर इंडिया या वेबसाइटशी बोलताना स्टॅन्झिन म्हणाला की कुटुंबावर आर्थिक संकट आल्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी मी पोर्टर म्हणून काम सुरू केलं.  2008 पासून त्यांनी 2016 पर्यंत भारतीय सैन्यात नियमितपणे पोर्टर म्हणून काम केले. त्यानी पुढे सांगितलं की, या भागातील बहुतेक तरुणांना सियाचीन ग्लेशियरवर पोर्टर म्हणून काम मिळवण्याचा प्रयत्न करतात पण दुर्दैवाने, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बचाव मोहिमेदरम्यान, इतर अयशस्वी झाल्यास किंवा कदाचित 'खूप उशीर' झाल्याचे कळल्यावर अनुभवी पोर्टरना संधी दिली जाते. हे ही वाचा-शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकला पडलं महागात; POK मध्ये अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त बेटर इंडियाला ऑनलाइन माहिती देताना तो म्हणाला, लष्करामध्ये पोर्टरला कॅज्युअल पेड लेबरर्स (CPL) मानले जाते आणि त्यांना पोस्टच्या ग्रेडनुसार पगार दिला जातो. ग्लेशियरवर सुमारे 100 पोस्ट्स आहेत ज्यांची उंची आणि त्या ठिकाणी सेवा करण्याच्या जोखमीवर आधारित पाच ग्रेड लष्कराने तयार केल्या आहेत. उंचावरच्या पोस्टवर काम करणाऱ्या पोर्टरला दिवसाला जास्तीत जास्त पगार 857 रुपये आहे, तर बेस कॅम्पमध्ये सेवा देणाऱ्यांना दिवसाला 694 रुपये पगार दिला जातो. कठीण हवामानाची परिस्थिती, हिमस्खलन, क्रेव्हासच्या धोक्याचा विचार करून पोर्टर फक्त तीन महिने काम करू शकतात. सलग 90 दिवस काम केल्यावर त्यांना पैसे मिळतात  आणि ते पोर्टर परमनंट जागांसाठी अर्ज करू शकतात आणि म्हणूनच सैन्य अशा पोर्टर्सना 89 दिवसांच्या चक्रात काम देते. 89 दिवस काम केल्यावर स्वत: स्टॅनझिनलाही दोन दिवसांसाठी खाली लडाखमध्ये पाठवलं गेलंय. स्थानिक शासकीय रुग्णालयात त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन नंतर तो पुन्हा लवकरात लवकर वर कामाला जातो.
    Published by:Meenal Gangurde
    First published: