मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘देशासाठी दुसरा मुलगा द्यायला तयार पण, दहशतावाद्यांना धडा शिकवा’

‘देशासाठी दुसरा मुलगा द्यायला तयार पण, दहशतावाद्यांना धडा शिकवा’

फोटो सौजन्य - ANI

फोटो सौजन्य - ANI

माझा दुसरा मुलगा देखील देशासाठी समर्पित करायला तयार असल्याची भावना शहिद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी बोलून दाखवली आहे.

भागलपूर, 15 फेब्रुवारी : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये 44 जवान शहिद झाले. देश शोकसागरात बुडाला. या हल्ल्यात कुणी बाप, नवरा, मुलगा गमावला. सारा देश शोक सागरात बुडालेला असताना शहिद जवानांच्या घरी काय स्थिती असेल? याचा केव्हा विचार केलाय? दहशतवाद्यांचा खात्मा करा, पाकला धडा शिकवा अशी मागणी देशभरातून होताना दिसत आहे. पण, यावेळी देखील माझा दुसरा मुलगा देशासाठी समर्पित करायला तयार असल्याची भावना एका बापानं बोलून दाखवली आहे. रतन ठाकूर हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले. त्यानंतर देखील त्यांच्या वडिलांनी आपला दुसरा मुलगा देखील देशासाठी समर्पित करायला तयार असून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी केला आहे.

रतन ठाकूर हे बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. गुरूवारी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 44 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली.

बलिदान व्यर्थ जाणार नाही – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यानंतर मंत्रिमंडळाच्या हालचालींना देखील वेग आला आहे. दरम्यान हल्ल्यानंतर सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.

VIDEO : Pulwama दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम

First published:

Tags: Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Terror attack