• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • केंद्रात महाआघाडीचं सरकार आलं तर अर्थमंत्री कोण? काय म्हणाले रघुराम राजन?

केंद्रात महाआघाडीचं सरकार आलं तर अर्थमंत्री कोण? काय म्हणाले रघुराम राजन?

आपल्या थर्ड आय या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रघुराम राजन हे सध्या भारतात आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 27 मार्च : लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेस आणि महाघाडीचं सरकार आलं तर केंद्रात अर्थमंत्री म्हणून कोण असतील याची चर्चा आता सुरू झालीय. रिझर्व्ह बँकेची माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी संधी मिळाली तर स्वीकारणार असे संकेत दिले आहेत. आपल्या थर्ड आय या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रघुराम राजन हे सध्या भारतात आले आहेत. संधी मिळाली तर तुम्हाला अर्थमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राजन म्हणाले, सध्या मी जिथे आहे तिथे आनंदी आहे. मात्र संधी मिळाली तर भारतासाठी काम करायला नक्कीच आवडेल. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याची जी घोषणा केली होती त्यासाठी त्यांनी ज्या अर्थशास्त्रज्ञांशी चर्चा केली होती त्यात राजन यांचाही समावेश होता. अशा झाल्या २०१४ च्या निवडणुका 2014 मध्ये निवडणूक आयोगाने 5 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. मत मतमोजणी 16 मे रोजी झाली होती. महाराष्ट्रात तीन टप्प्यात 10, 17 आणि 24 एप्रिलला मतदान झालं होतं. 31 मे 2014 ला 15 व्या लोकसभेची मुदत संपली होती. त्या आधी 15 दिवस निकाल जाहीर झाले होते. 2019 ची निवडणूक ही 17 व्या लोकसभेसाठी होत आहे. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी 81 कोटी 45 लाख मतदार मतदानासाठी पात्र होते. गेल्या पाच वर्षात त्यात 10 कोटी लोकांची भर पडली होती. 2019 मध्ये त्यात आणखी वाढ होणार आहे. यात 23 कोटी मतदार हे 18 ते 19 या वयोगटातले होते. एकूण मतदारांमध्ये त्यांचं प्रमाण हे 2.7 टक्के एवढं येतं. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी 8 हजार 251 उमेदवार रिंगणात होते. 9 टप्प्यातल्या मतदानाची एकूण सरासरी ही 66.38 टक्के एवढी होती. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातलं हे प्रमाण सर्वात जास्त आहे. NDA ची कामगिरी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ने 336 जागा जिंकून इतिहास घडवला होता. 1984 पासून देशात आलेलं हे पहिलच पूर्ण बहुमतालं सरकार होतं. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला फक्त 59 जागा मिळाल्या होत्या. त्यात 44 जागा या काँग्रेसच्याच आहेत. काँग्रेसला आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वाधिक दारुण पराभव आहे. नियमानुसार विरोधीपक्ष म्हणून स्थान मिळवायचं असेल तर एकूण जागांच्या 10 टक्के म्हणजे 55 जागा मिळविणं अपेक्षीत आहे. मात्र काँग्रेसला तेवढ्याही जागा 2014 मध्ये मिळाल्या नव्हत्या.
  First published: