मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना गुडन्यूज देणार? 'या' आहेत आजच्या 8 ठळक बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना गुडन्यूज देणार? 'या' आहेत आजच्या 8 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: राज्यातील राजकारणाचे अपडेट्स आणि देशभरातील महत्त्वाच्या आजच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

1. भाजप नेत्या पंकजा मुंडे गुरुवारी गोपीनाथगडावर मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात पंकजा मुंडे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा नाराज आहेत. त्यामुळे गुरुवारी त्या नेमकी कोणती घोषणा करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. माझ्या फेसबुक पोस्टचा काय अर्थ घ्यायचा हे ज्यानंत्यानं ठरवावं, खडसेंच्या वक्तव्यांमध्ये अगतिकता आहे. त्यांचं बोलणं गांभीर्यानं घ्यायला हवं असं त्या म्हणाल्या. न्यूज18 लोकमतला त्यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली.

2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकवीरेचं दर्शन घेणार आहेत. किल्ले शिवनेरीवरही छत्रपती शिवरायांना वंदन करून शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नगरविकास खात्यातील कामांना रेड सिग्नल दिला आहे. कामांसाठी लागणाऱ्या निधीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. निधीअभावी अनेक विकासकामांचा खोळंबा झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

4. राजकारणाचं रणमैदान गाजवणाऱ्या शरद पवारांचं आज 80 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. देशभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देत आहेत.

5. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी बुधवारी संध्याकाळी मंजूर झालं. राज्यसभेत तब्बल 7 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश मिळालं आहे. विधेयकाच्या चर्चेदरम्यान शिवसेना उपस्थित असली तरीही मतदानावेळी त्यांनी सभात्याग केल्यानं कुजबूज होत आहे. लोकसभेत शिवसेनेनं CAB ला पाठिंबा दिला होता मात्र काँग्रेसचा दबाव असल्यानं शिवसेनेनं सभात्याग केला का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

6. शिवसेनेनं सभात्याग केल्याच्या निर्णयाचं काँग्रेसकडून स्वागत. भारताच्या इतिहासातील बुधवारचा काळा दिवस. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची जहरी टीका.

अयोध्या खटल्याच्या फेरविचार याचिकेवर गुरुवारी सकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. वादग्रस्त जागी राममंदिर बांधण्याच्या निर्णयाला विरोध असल्यानं फेरविचार याचिका दाखल कऱण्यात आली असून त्याबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

7. हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सकाळी सुनावणी होणार आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरोपींच्या मृतदेहांवर अद्यापही अंत्यसंस्कार नाही.

तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी केली. सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले आहे की, हैदराबाद चकमकीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नेमण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

8. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या माऱ्यापुढे विंडीजचा संघ गारद. 2 -1 नं टी-20 मालिका भारताच्या खिशात

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 07:31 AM IST

ताज्या बातम्या