मराठी बातम्या /बातम्या /देश /

Simi Karan : एकाच वर्षात IIT आणि UPSC पास, जाणून घ्या कसं केलं नियोजन

Simi Karan : एकाच वर्षात IIT आणि UPSC पास, जाणून घ्या कसं केलं नियोजन

सिमी करण (Simi Karan) केवळ पहिल्याच प्रयत्नात ग्रॅज्युऐशन करत यूपीएससी परिक्षा पास झाली नाही. तर यासोबतच 33 व्या रँकसोबत टॉपही (IAS Topper) केलंही. सिमीनं आपल्या याच यशाचा मंत्र यूपीएससी (UPSC) करणाऱ्या इतरांनाही सांगितला आहे.

सिमी करण (Simi Karan) केवळ पहिल्याच प्रयत्नात ग्रॅज्युऐशन करत यूपीएससी परिक्षा पास झाली नाही. तर यासोबतच 33 व्या रँकसोबत टॉपही (IAS Topper) केलंही. सिमीनं आपल्या याच यशाचा मंत्र यूपीएससी (UPSC) करणाऱ्या इतरांनाही सांगितला आहे.

सिमी करण (Simi Karan) केवळ पहिल्याच प्रयत्नात ग्रॅज्युऐशन करत यूपीएससी परिक्षा पास झाली नाही. तर यासोबतच 33 व्या रँकसोबत टॉपही (IAS Topper) केलंही. सिमीनं आपल्या याच यशाचा मंत्र यूपीएससी (UPSC) करणाऱ्या इतरांनाही सांगितला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : यूपीएससीची (UPSC) परिक्षा म्हटलं, की डोळ्यासमोर येतात दिवस रात्र आणि वर्षानुवर्षे अभ्यास करणारी मुलं. या परीक्षेसाठी अथक प्रयत्न करणारे अनेक विद्यार्थीही अनेकदा यात सफल होत नाहीत. मात्र, ओडीसाच्या सिमी करण (Simi Karan) हिच्यासारखेही काही विद्यार्थी असतात, जे पहिल्याच प्रयत्नात ग्रॅज्युऐशनच करत केवळ यूपीएससी परिक्षा पास होत नाहीत. तर यासोबतच 33 व्या रँकसोबत टॉपही (IAS Topper) करतात. तेही असं तसं ग्रॅज्युऐशन नाही, तर आयआयटी इंजिनिअरिंग. सिमीचं हे यश सर्वांनाच प्रोत्साहित करणारं आहे. तिच्या या प्रवासामुळं हे सिद्ध होतं, की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही मेहनत आणि नियोजनामुळं शक्य होतात. तिच्या या यशाबाबत सिमीनं एका मुलाखतीत माहिती दिली आहे. जाणून घेऊयात तिचा हा प्रवास कसा होता.

सिमी ही ओडिसाची रहिवासी आहे. मात्र, तिचं शिक्षण आणि ती लहानाची मोठी भिलाईमध्ये झाली. सिमी नेहमीच एक हुशार विद्यार्थीनी होती आणि शाळेत असतापासूनच तिला चांगले मार्क मिळायचे. सुरूवातीपासून सिमीनं यूपीएससी करायची असं ठरवलं नव्हतं. त्यामुळं तिनं बारावीनंतर ग्रॅज्युऐशन केलं. यासाठी तिनं आयआयटीची एन्ट्रान्स दिली आणि सिलेक्ट होऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करू लागली. तेव्हाच इंटर्नशिप करत असताना ती आसपासच्या झोपडपट्टीती परिसरातील मुलांना शिकवू लागली. याच वेळी तिच्या डोक्यात आलं, की एखाद्या अशा क्षेत्रात काम करावं ज्यामुळे गरजू लोकांना मदत करता येईल आणि सिमीनं यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.

अशी केली सुरूवात -

सिमी म्हणते, की तिनं सर्वात आधी टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या आणि इंटरनेटच्या मदतीनं आपल्यासाठी बूक लिस्ट तयार केली. यासोबतच तिनं ही गोष्टही लक्षात ठेवली, की पुस्तकं मोजकीच ठेवून त्यांचाच वारंवार अभ्यास करायचा आहे. ती परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमालाही तितकंच महत्त्व देते. ती म्हणते, की यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचं आधी छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करा आणि मग तयारी सुरू करा. यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमाचं ओझं जास्त वाटणार नाही. प्री साठी सिमी रिवीजनवर पूर्ण फोकस करण्याचा सल्ला देते. जी पुस्तकं तुमच्याजवळ आहेत, ती वारंवार वाचत राहा आणि रिवीजन करत राहा. पुढे स्वतःचीच टेस्ट घ्या. यामुळे तुम्हाला माहिती होतं, की तुम्हाला कोणत्या विषयात सुधारण करणं गरजेचं आहे, असं तिनं म्हटलं.

उत्तर लिहिण्याची तयारी -

सिमी म्हणते, की तुम्ही कितीही सराव करा, मात्र उत्तर लिहिण्याचा सराव केला नाही तर सगळी मेहनत व्यर्थ आहे. त्यामुळं, जेव्हा तुमच्याकडे एवढी माहिती जमा झाली असले, ज्यानं तुम्ही उत्तराच्या सरावासाठी सुरूवात करू शकता, तेव्हापासून उत्तर लिहिण्याचा सराव करा. सुरूवातील ती उत्तर चांगली लिहिता येणार नाहीत. मात्र, घाबरू नका. ती चांगली लिहिता यावी यासाठीच आपण हा सराव करत असल्याचं सिमीनं म्हटलं. यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे टाईम मॅनजमेंट म्हणजेच वेळेचं व्यवस्थित नियोजन.

ग्रॅज्युऐशन आणि यूपीएससीचा अभ्यास सोबतच करण्यासाठी तुम्हाला अत्यंत मेहनत घेऊन या दोन्ही गोष्टींचं संतुलन साधावं लागतं. सिमीला यासाठी वेळ काढावा नाही तर वेळ चोरावा लागला. क्लासच्या वेळी ब्रेक मिळाला की अभ्यास करणं. पार्टी फेअरवेल अशा गोष्टी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणं, ई नोट्स सोबत ठेवणं, जेणेकरून वेळ मिळताच त्या वाचता याव्या. अशा अनेक गोष्टी करत सिमीनं सिद्ध केलं, की नियोजन आणि ध्येय निश्चित असेल तर अवघडात अवघड ध्येयही गाठलं जाऊ शकतं.

First published:

Tags: IIT, Upsc exam