Elec-widget

राजकारणापासून ते क्रीडाविश्वापर्यंत 'या' आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

राजकारणापासून ते क्रीडाविश्वापर्यंत 'या' आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रातील सत्तेवरुन सुरु असलेलं राजकारण ते क्रीडाजगतापर्यंत आजच्या महत्त्वाच्या बातम्या.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्तेवरुन सुरु असलेलं राजकारण ते क्रीडाजगतापर्यंत आजच्या महत्त्वाच्या बातम्या.

1. राष्ट्रपती राजवटीनंतर पुन्हा सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरु झाली आहेत. बैठकांचा सिलसिला सतत्यानं सुरू असला तरी तोडगा मात्र अद्यापही निघाला नाही. भाजप कार्यकारणीची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचीही बैठक होणार. सरकार स्थापनेचा पेच आजतरी सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. काटोल जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

3.'देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे अनेक सभांमध्ये ठासून सांगितलं होतं.' सेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अमित शाहांनी पहिल्यांदाचा गौप्यस्फोट केला. सेनेच्या मागण्या अमान्य असल्याचंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

4.उद्धव ठाकरेंसोबतच्या बंद दाराआडच्या चर्चेचा तपशील उघड करण्यास अमित शाहांचा विरोध. उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

Loading...

5.राज्यपालांनी अन्याय केला हा विरोधकांचा आरोप पूर्णपणे चुकीचा, बहुमत असल्यास सरकार बनवावं अमित शाहांचा सेना आणि आघाडीला टोला, मध्यावधी निवडणुकांची शक्यताही फेटाळली.

6. राफेल प्रकऱणी आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकांवर आज निकाल आहे. आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार. राफेल कराराच्या पुनर्विचार याचिकांवर आज निर्णय येण्याची शक्यता. राफेल प्रकऱणात न्यायालयानं 2018 मध्ये दिलेल्या निकालाबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातही आज सर्वोच्च न्यायालय आदेश देण्याची शक्यता . शबरीमला मंदिर प्रकरणात सर्वोच्च अंतिम आदेश येण्याची शक्यता

7.येत्या हिवाळी अधिवेशनात राम मंदिराबाबतचं विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ट्रस्टच्या स्थापनेसाठी कायदा केला जाण्याची चिन्हं.

8.भारत आणि बांगलादेश दरम्यान आज इंदूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. शमी आणि उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 08:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...