Home /News /national /

मुख्यमंत्री विरोधकांवर तोफ डागणार? आघाडीत बिघाडी? यंदा राज्यात मान्सूनच लवकर आगमन! TOP बातम्या

मुख्यमंत्री विरोधकांवर तोफ डागणार? आघाडीत बिघाडी? यंदा राज्यात मान्सूनच लवकर आगमन! TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 14 मे : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून शनिवारी शिवसेनेचा पहिला मोठा मेळावा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भोंगे आणि हिंदूत्वावरुन मनसे आणि भाजपने शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. या सर्वांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोफ डागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यंदा मान्सून राज्या लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत वाचा. बीकेसी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून शनिवारी शिवसेनेचा पहिला मोठा मेळावा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व आणि इतर मुद्द्यांवर मनसे आणि भाजपसारख्या राजकीय विरोधकांवर तोफ डागण्याची शक्यता आहे. 'काँग्रेसनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला', जयंत पाटलांचा पलटवार गोंदिया जिल्हा परिषद (Gondia ZP) पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) अध्यक्ष आणि सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) आणि भाजप (Congress) यांच्यात युती झाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) संतापले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान केलं. नाना पटोलेंच्या विधानाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नितीन राऊतांचं नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संताप व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसच्या (Congress) पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप नाना पटोलेंनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी समाचार घेतला होता. त्यानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नाना पटोलेंची भूमिका योग्य असल्याचं मत मांडलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला राज्य आणि देशात महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्यापासून ते प्रत्येक जीवनाश्यक वस्तूचा दर वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र GGIPR ने दिलेल्या माहितीनुसार आता दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या PUC (Pollution Under Control) चाचणीचा दर देखील वाढला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांचे सामूहिक राजीनामे गुरुवारी 35 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट (Kashmiri Pandit Rahul bhat gunned down) यांच्या हत्येवरून जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तणाव वाढला आहे. राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे सामूहिक राजीनामे (Kashmiri Pandits Mass Resignations) पाठवले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. डी गँगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते पाकिस्तानच्या हातातील ISI या दहशतवादी संघटनेच्या छत्रछायेखाली लपून बसलेल्या डी गँगच्या (D Gang) खुरापती काही संपायच्या नाव घेत नाही. दहशतवादी कारवाया करणारा दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता राजकीय नेत्यांच्या (politicians) मुळावर उठलाय, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासातून समोर आला आहे. दहशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. त्यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Mosque loud speaker sound) मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेनंतर धमकीचे फोन (threaten call) आणि पत्र येत होते. त्यामुळे मनसे (MNS) नेत्यांकडून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. अखेर मनसे नेत्यांची ही मागणी राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. दिल्लीत आग्नितांडवाने हाहा:कार देशाची राजधानी दिल्ली (Delhi Fire) आज आगीच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ (Mundka Metro Station) असलेल्या एका कमर्शिअल इमारतीला काल संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. यंदा महाराष्ट्रात मान्सून 4 दिवस आधीच येणार उन्हाळ्याच्या झळा (heat wave) जाणवू लागल्या की सर्वांनाच वेध लागतात ते मान्सून (monsoon) कधी दाखल होणार. सर्वात पहिल्यांदा बळीराजाला मान्सून वेध लागलेले असतात कारण जून महिना हा पेरणीचा हंगाम असतो यामुळे शेतकरी (farmer) आपल्या शेताची मशागत करून मान्सूनची वाट पाहत बसलेला असतो दरम्यान आता ही प्रतिक्षा संपणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd report) मान्सून केरळमध्ये 27 मे ला दाखल होणार आहे. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर आधीच दाखल होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Rain, Uddhav thackarey

    पुढील बातम्या