Home /News /national /

पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त, संभाजीराजे सनेची ऑफर स्वीकारणार? आसाममध्ये पावसाचा हाहाकार TOP बातम्या

पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त, संभाजीराजे सनेची ऑफर स्वीकारणार? आसाममध्ये पावसाचा हाहाकार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 23 मे : मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारनेही (Thackeray government) पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या निर्णयावर फडणवीस यांची टीका. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. राज्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शिवसेनेचा बी प्लॅन काय? सोमवारी दुपारी 12 वाजता शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचं शिवसेना शिष्टमंडळाचे संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रण. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेचं पक्ष प्रवेशाचं निमंत्रण स्विकारलं नाही, तर शिवसेनेचा प्लान बी तयार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या प्लॅन बी नुसार ग्रामिण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज तयार असल्याची वरीष्ठ सूत्रांची माहीती. केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही पेट्रोल डिझेलवरील कर कमी! मोदी सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पेट्रोल डिझेलच्या दर कपातीनंतर ठाकरे सरकारवर फडणवीसांची खरमरीत टीका मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारनेही (Thackeray government) पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारने 'उंटाच्या तोंडात जिरे'! दिले असल्याची टीका केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संभाजी राजेंनी स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी  (Sambhaji Raje) निमंत्रण स्वीकारलं असल्याचं समोर आलं आहे. उद्या 12 वाजता संभाजीराजे वर्षावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगावा राजेंनी स्वीकारला असून राज्यसभा सहाव्या जागेच्या मुद्द्यावर महत्वाचं वळण लागलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहुत लावणार हजेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 14 जून रोजी देहूत येणार असल्याचं समोर आलं आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने (sugar factory) जवळ असुनही उसाला तोड (sugarcane farmer) येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आसाममध्ये महापुराचा हाहाकार ईशान्येकडील एक प्रमुख राज्य म्हणून आसामची (assam) ओळख आहे. सध्या आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. (asaam flood affected area) भूस्खलन (landslide) आणि पुराच्या पाण्याने राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. आसाममधील एकूण 34 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सुमारे सात लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या