मुंबई, 16 मे : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, फडणीवस यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, 17 मे पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.
मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात ते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या 'ठोक'सभेतील महत्त्वाचे मुद्दे
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गोरगाव येथील नेस्को सेंटरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी घेतलेल्या सभेला प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
फडणवीस यांच्या 'ठोक सभे'ला मुख्यमंत्री ठाकरेंचे एका ओळीत उत्तर
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर, 'त्यांना गुरु शिष्याचे नाते सांगायची गरज नाही' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी प्रत्युत्तर दिलं.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या थरावर जाऊन फेसबुक पोस्ट (facebook post) करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या (ketaki chitale) अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्यात (akola) गुन्हा दाखल झाल्यानंतर आता केतकी चितळेवर नेरूळ पोलीस ठाण्यात (nerul police station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अकोला पोलीस सुद्धा केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले होते. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा
परभणी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विषबाधेमुळे 100 पेक्षा जास्त नागिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
'चिंतन' शिबिरानं सोनिया गांधींची 'चिंता' वाढवली?
संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीतीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी काँग्रेसने नवसंकल्प शिबिराचं (Congress Chintan Shivir news) आयोजन केलं होतं. मात्र, शिबिरात नेतृत्वाचा मुद्दा (Congress Party President) गाजला. यादरम्यान अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही अध्यक्ष करण्याची मागणी (Demand for Priyanka Gandhi Vadra to be Congress President) केली.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
17 मेपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट
असानी चक्रीवादळानंतर देशाच्या उत्तरेत तीव्र उष्णतेची (heat wave) लाट आली आहे. देशाच्या राजधानीसह अन्य राज्यात अक्षरश: सूर्य आग ओखत असल्याने तेथील नागरिकांचे जनजीवर विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 16 मे पासून पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये लोकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.