Home /News /national /

फडणवीस सभेतून देणार जशासतसे उत्तर? पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चितळेला अटक TOP बातम्या

फडणवीस सभेतून देणार जशासतसे उत्तर? पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चितळेला अटक TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 15 मे : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी सभा पार पडली. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. दरम्यान, कालच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे, भाजप आणि राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. आता फडणवीस याला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर फडणवीसांची मुंबईत मोठी सभा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी सभा पार पडली. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची याआधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानावर सभा झाली होती. त्यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली होती. आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या टीकेनंतर फडणवीस काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. स्वत: मुख्यमंत्री असल्याचं विसरले', चंद्रकांत पाटलांची टीका "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी मुंबईतील (Mumbai) सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले", अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेना म्हणजे गटारतले बेडूक, गिरीश महाजनांची जीभ घसरली 'शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. तसंच, 'गटरातील बेंडूक' म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा (shivsena) उल्लेखही केला. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. वाचाळगिरी भोवली, अखेर केतकी चितळेला अटक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे केतकी चितळेला चांगलेच भारी पडले आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला (ketaki chitle) अटक केली आहे.  केतकीला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. स्वस्त धान्य दुकानात आता मापात पाप नाही, सरकारने लागू केला नवा नियम स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांचा लाभ घेणारा मोठा वर्ग समाजात आहे. त्यांच्यासाठी सरकार रेशनविषयक (Rationing) अनेक नवे नियम लागू करत असतं. अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये, कोविडसारख्या साथरोगांमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत रेशन दुकानांमुळे अनेकांना फायदा झाला आहे. काही ठिकाणी मात्र स्वस्त धान्य दुकानांमध्ये घोटाळे झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना एक नियम लागू केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Uddhav thackarey

    पुढील बातम्या