मराठी बातम्या /बातम्या /देश /फरार मनसे नेते देशपांडे यांचा अटकपूर्व अर्ज, राज्यात उष्णेतीची लाट, ज्ञानवापी मशीद प्रकरणार सुनावणी TOP बातम्या

फरार मनसे नेते देशपांडे यांचा अटकपूर्व अर्ज, राज्यात उष्णेतीची लाट, ज्ञानवापी मशीद प्रकरणार सुनावणी TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 10 मे : फरार मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात अर्ज केला. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खाजगी हॅास्पिटलमध्ये उपचाराकरता परवानगी द्यावी की नाही यावर कोर्ट आपला निकाल देणार आहे. राज्यात पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सुनावणी होणार आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत जाणून घ्या.

फरार मनसे नेते संदीप देशपांडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

फरार मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात अर्ज केला. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

मनसे नेते आणि प्रवक्त्यांची मुंबईत बैठक

भोंग्याविरोधात सुरू केलेल्या आंदोलनानंतर आता मनसे नेते आणि प्रवक्त्यांची मुंबईत बैठक होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळणार का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खाजगी हॅास्पिटलमध्ये उपचाराकरता परवानगी द्यावी की नाही यावर आज कोर्ट आपला निकाल देणार आहे.

राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस ( Heat wave in the maharashtra ) वाढतच चालला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 45 चा पार केले आहे. सर्वात जास्त तापमान हे विदर्भात (vidarbha) असून सर्वात कमी तापमानाची नोंदही महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि मालेगावात झाली आहे. राज्यात पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मलिक यांच्या चौकशीतून NIA ची कारवाई

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim)  स्लिपर सेल असलेल्या अनेक ठिकाणी 'एनआयएने (National Investigation Agency) मुंबई धाडी टाकल्यात. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुचक विधान केलंय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik ik) यांच्या चौकशीतूनच एनआएने या पुढील कारवाया झाल्या आहेत. एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील' असा दावा प्रसाद लाड (prasad laad) यांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मुंबईत दाऊदचा डाव उधळला

भल्या पहाटे मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  (Underworld Don Dawood Ibrahim) डी गॅंग टेरर फंडिंग संबंधित NIA ने (National Investigation Agency) छापे टाकले आणि मुंबईसह देशात एकच खळबळ उडाली. दाऊदच्या मुंबईतील अनेक साथीदारांवर NIAने छापे टाकले. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार येथे हे छापे टाकण्यात आले होते. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग स्मगलर आणि असे काही व्हाईट कॅालर प्रतिष्ठित नागरिक आहेत जे दाऊदच्या टेरर फंडिंगचा (terror funding) भाग असल्याचा NIA ला संशय आहे. आणखी 87 जण NIA च्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

कचऱ्याला लावली आग अन् झोपडपट्टी जळून खाक,

नागपूरच्या (nagpur mahakali slum area) महाकाली झोपडपट्टीमध्ये एका इसमाने घराशेजारी कचरा पेटला आणि कामावर निघून गेला. त्यामुळे नंतर लागलेल्या आगीत महाकाली झोपडपट्टीतील जवळपास 60 च्या वर झोपड्या जळून राख झाल्या आणि 22 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

PM शेतकरी योजनेचा 11 वा हप्ता नाही झाला खात्यात जमा, हे कारण आले समोर

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) 11 व्या हफ्त्यासाठी शेतकऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकूण 10 हफ्ते आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, मात्र योजनेचा 11 हफ्ता अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) चिंताग्रस्त आहेत. आता या मागचं कारण स्पष्ट होत आहे. या योजनेसाठी ई-केवायसी (e KYC) पूर्ण केल्यानंतरच 11वा हफ्ता जमा केला जाईल, असा अंदाज बांधला जातो आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सुनावणी

ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) आणि विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) प्रकरणी सुरू असलेल्या वादावर मंगळवारी उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या वादाशी संबंधित 6 प्रकरणे उच्च न्यायालयात सुरू असून, त्यापैकी 4 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. उर्वरित दोन प्रकरणांची सुनावणी सध्या सुरू आहे. आता सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालय एकत्रितपणे निकाल देणार आहे.

Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट!

अद्याप कोरोनाव्हायरसचं संकट टळलेलं नाही तोवर आणखी एका व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्स  व्हायरसने (Monkeypox Virus) चिंता वाढवली आहे. यूकेमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Heat, MNS