मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबईतील 72 टक्के मशिदींकडून नियमांच पालन, कोरोना पुन्हा वाढतोय.. देशविदेशातील TOP बातम्या

मुंबईतील 72 टक्के मशिदींकडून नियमांच पालन, कोरोना पुन्हा वाढतोय.. देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 20 एप्रिल : मशिदीवरील भोंग्याच्या वादानंतर मुंबई शहरातील 72 टक्के मशिदींनी पहाटेच्या पहिल्या अजानच्या वेळी लाऊडस्पीकरची डेसिबल पातळी कमी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करणार आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियान गुंडाळण्याची शक्यता. वादानंतर जहांगीरपुरी भागात बुलडोझर चालणार तर देशात पुन्हा एकदा कोरोना प्रकरणे वाढू लागली आहेत. यासह देशविदेशातील बातम्या काही मिनिटांत वाचा. मुंबईत मशिदींकडून नियमांचं पालन मुंबई पोलिसांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, शहरातील 72 टक्के मशिदींनी पहाटेच्या पहिल्या अजानच्या वेळी स्वतःच्या लाऊडस्पीकरची डेसिबल पातळी कमी केली आहे. काही प्रकरणांमध्ये, मशिदींनी स्वतःहून लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की या मशिदींवर कोणताही दबाव आलेला नाही. वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करणार आहेत. तर उद्या ST कर्मचाऱ्यांच्या जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. मंत्री धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली 'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली. नाशिकचे स्मार्ट सिटी अभियान वादात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत 2016 साली नाशिक शहराची निवड तर झाली मात्र तेव्हापासूनच हे अभियान वादात सापडले होते. एकूण 1 हजार 52 कोटीच्या स्मार्ट सिटी निधीपैकी फक्त 46 कोटीचीच कामे गेल्या पाच वर्षात पूर्ण झाली असून तब्बल एक हजार कोटींची कामे अद्याप दृष्टीक्षेपातच नाही. सध्या प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शहराचे सुशोभीकरण करणे अशी काही कामे सुरू तर आहेत. मात्र, ती देखिल अत्यंत संथगतीने. विशेष म्हणजे 1 एप्रिल 2022 नंतर नवीन कामांच्या निविदा न काढण्याचे निर्देश प्राप्त झाले असून जून 2023 मध्येच हे अभियान गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.

वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

दिवसभर असह्य उकाडा आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण असा काहीसा नित्यक्रम सुरू असताना आता 21 ते 23 एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. यातील 21 आणि 22 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नारायण राणेंनी सरकार कोसळण्याची सांगितली नवी तारीख

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळण्याबाबतची भविष्यवाणी केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्यात सरकार कोसळेल, अशाप्रकारचं विधान केलं होतं. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीबाबत नवी भविष्यवाणी केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असा नवा दावा नारायण राणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी याआधी असे अनेक दावे आणि तारखा जाहीर केल्या आहेत. पण अद्यापही महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं नाही. याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. जहांगीरपुरी मध्ये तपास 16 एप्रिल (शनिवार) रोजी काढण्यात आलेल्या हनुमान जयंती मिरवणुकीत हाणामारी करणाऱ्या 5 दंगलखोरांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी जहांगीरपुरी हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अन्सार, सलीम चिकना, इमाम शेख उरफ सोनू, दिलशाद आणि अहेद या पाच जणांवर NSA चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगीरपुरी भागात बुलडोझर चालणार अवैध मालाने वेढलेल्या रस्त्यांच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालणार आहे. या मोहिमेसाठी दिल्ली महानगरपालिकेने दिल्ली पोलिसांच्या 400 हून अधिक कर्मचार्‍यांची मागणी केली आहे. जे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळतील. ही मोहीम 20 आणि 21 एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे मास्टर प्लॅन घेऊनच प्रशांत किशोर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (prashant kishor join congress) काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत काँग्रेसने कमालीची गुप्तता बाळगली आहे. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात काँग्रेसचे चार नेते निर्णय घेणार असून यामध्ये मुकुल वासनिक (Mukul Wasnik), दिग्विजय सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला ( Randeep Singh Surjewala) आणि के सी वेणुगोपाल यांचाा समावेश आहे. या चार नेत्यांची शिफारस आल्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बीड जिल्ह्यात जलसंधारण विभागात घोटाळा? बीडमध्ये जलसंधारण विभागाच्या (Department of Water Resources) अभियंता (engineer) आणि कंत्राटदार (contractor) यांच्यातील एका फोनचं रेकॉर्डिंग (Call Recording) चांगलंच व्हायरल झालं आहे. संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागत नेमकं काय सुरुय? असा प्रश्न रेकॉर्डिंग ऐकल्यावर उपस्थित केला जातोय. कोरोना काळात स्थगित केलेल्या कामांसाठी पैशांची मागणी केली जातेय. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्टपणे समजतंय. विशेष म्हणजे दिलेले पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तरी का काम होत नाही? असा धक्कादायक प्रश्न या संवादाच्या माध्यमातून जगासमोर आला आहे. कोरोना अलर्ट! केंद्र सरकारने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मिझोराममध्ये कोरोनाच्या वाढलेल्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करणारे पत्र लिहून या राज्यांनी या प्रकरणावर नियंत्रण कसे ठेवावे हे सुचवले आहे. तामिळनाडूमध्ये धर्मांतर दक्षिण तामिळनाडूच्या काही भागांमध्ये सर्रासपणे धर्मांतर होत असल्याचे समोर आले आहे. हे धार्मिक गट विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करण्यास सांगत आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील शांतता करार कठीण का आहे?

रशिया युक्रेन युद्धाबाबत (Russia Ukraine War) सुरुवातीपासूनच असे बोलले जात आहे की ते दीर्घकाळ चालणार आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा (Peace Talks between Russia and Ukraine) घडवून आणण्याचे प्रयत्नही करण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. आता या सलोखा शांततेच्या प्रयत्नांची चर्चा ऐकायला मिळत नाही. युक्रेनच्या दोन वरिष्ठ शांतता वार्ताहरांना विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर आहे, अशा वातावरणात चर्चा होण्याची शक्यता नाही. त्याचवेळी, युक्रेन कोणत्याही प्रकारे शांततेसाठी तयार नाही आणि युद्धाचे कारण अजूनही शिल्लक असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. अखेर शांतता किंवा युद्धविराम यासाठी वाटाघाटी करणे कठीण का झाले आहे? नमल राजपक्षे CNN-News18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत, श्रीलंकेचे नेते आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे म्हणतात की माझ्या वडिलांनी विरोधकांना येऊन सरकार ताब्यात घेण्याचे निमंत्रण दिले होते. दुर्दैवाने, विरोधकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना चिंता आहे की काही पक्ष फायद्यासाठी निषेधाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
First published:

Tags: Corona, Raj thackarey

पुढील बातम्या