मुंबई, 21 एप्रिल : औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या जामिन अर्जावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी'चा विजेता!. राजधानी दिल्लीत पुन्हा कोरोनाचा विस्फोट तर जहांगीरपुरी येथील कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर थांबवली. यासह देशविदेशातील महत्वाच्या बातम्या अगदी काही मिनिटांत..
औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही?
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या जामिन अर्जावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. तर कोठडीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जामिन अर्जावरही सुनावणी होणार आहे.
राज्यात अराजकता माजण्याची भीती, गृहमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे (Mosque Speaker Sound) खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटमनंतर राज्य सरकार सतर्क (Maharashtra Government alert) झालं आहे. कारण भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन काही मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच अनेक मौलवींनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे येत्या 3 मे नंतर राज्यात भोंग्यावरुन संघर्ष उद्भवण्याती भीती व्यक्त केली जात आहे.
पुण्यातली मोठमोठी हॉटेल, मंगल कार्यालये जमीनदोस्त
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिक्रमण विभागाकडून (Department of Encroachment) आज डीपी रोडवर (Pune DP road) कडक कारवाई करण्यात आली आहे. डीपी रोड म्हटला की मोठमोठ्या हॉटेल्स (Hotels), मंगल कार्यालये (Marriage hall) पुणेकरांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण त्यातील अनेक हॉटेल्स आणि मंगल कार्यालये ही सरकारी जागेवर अतिक्रमण करुन बांधण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती आज समोर येत आहे.
150 गुन्हे आणि 61 जवानांच्या हत्येची मुख्य सुत्रधार माओवादी महिलेचा तुरुंगात झाला अंत
माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचे सचिव असलेली आणि पोलिसांच्या ताब्यात तुरूंगात असलेल्या नर्मदक्का ( Maoist Narmada dead) या जहाल माओवादी नेत्याचा मृत्यू झाला आहे. नर्मदक्कावरतब्बल 61 जवानांच्या हत्येत मुख्यसुत्रधार होती. तिच्या मृत्यूमुळे माओवाद्यांच्या चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी'चा विजेता!
'हिंदी इंडियन आयडल'ने बॉलिवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा एक गायक दिले. आता मराठीत सोनी मराठी वाहिनीवर पहिले 'इंडियन आयडल मराठी' ( Indian Idol Marathi) चे पर्व पार पडले आहे. या पर्वात पनवेलचा सागर म्हात्रे (sagar mhatre) विजेता ठरला आहे.
गुंडांवर झाड फेकून मारणारे कृष्ण प्रकाश यांची बदली
महाविकास आघाडी सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्य पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या निर्णय आणि भूमिकेमुळे कायम चर्चेत असणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Police Commissioner Krishna Prakash transferred) यांची बदली करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जहांगीरपुरी हिंसाचार
वायव्य दिल्लीतील जहांगीरपुरी येथील विध्वंस मोहीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर थांबली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
दिल्लीत पुन्हा कोरोनाचा विस्फोट
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) संकट ओसरल्याचं चित्र होतं. पण आता कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाच्या (Delhi Corona Updates) नव्या रुग्णसंख्येचा आज विस्फोट होताना दिसत आहे. कारण दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 1009 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्या वर
यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारताच्या 2 दिवसीय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. यूकेचे पंतप्रधान भारताला युक्रेनवर सल्ला देणार नाहीत. परंतु, यूकेची भूमिका नक्कीच मांडतील आणि भारतीय दृष्टीकोन ऐकतील.
रशियाने सरमत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने क्रेमलिनच्या शत्रूंना 'दोनदा विचार करायला लागेल' असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वक्फ बोर्डाची भरती PSC कडे पाठवण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम संघटनांची बैठक बोलावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj thackarey, Top news india