Rbse 10th result 2019 : राजस्थान बोर्डाचा दहावीचा रिझल्ट इथे पाहा

Rbse 10th result 2019 : राजस्थान बोर्डाचा दहावीचा रिझल्ट इथे पाहा

राजस्थान बोर्डाचे दहावीचे निकाल आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहेत. हे निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दिसतील. तसंच News18 च्या खाली दिलेल्या लिंकवर थेट पाहता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : राजस्थान बोर्डाचे दहावीचे निकाल आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहेत. हे निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दिसतील. तसंच इथेसुद्धा खाली दिलेल्या लिंकवर थेट पाहता येईल.

राजस्थान बोर्डाने सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येतील, असं जाहीर केलं आहे. दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेचे हे निकाल थोड्याच वेळात इथल्या लिंकवर पाहता येईल. News18 च्या सर्व वेबसाईट्सवर हे निकाल थेट पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मागच्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचे निकाल लागले. तेसुद्धा News18 च्या वेबसाईटवर उपलब्ध होते. येत्या आठवड्यात महाराष्ट्रातल्या दहावीच्या बोर्डाचेही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप या निकालासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान राजस्थान बोर्डाचे 10 वी चे निकाल बोर्डाच्या ajresults.nic.in, rajeduboard.nic.in आणि rajasthan. gov.in या वेबसाईट्सवर जाहीर होतील. त्याच वेळी इथल्या लिंकवर सुद्धा त्या दिसू शकतील. राजस्थानमधल्या 11 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading