News18 Lokmat

RBI नं केली रेपो दरात कपात, आता गृहकर्ज कमी होण्याची शक्यता

RBI नं आपलं तिमाही धोरण जाहीर केलंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 12:20 PM IST

RBI नं केली रेपो दरात कपात, आता गृहकर्ज कमी होण्याची शक्यता

मुंबई, 06 जून : RBI नं आपलं तिमाही धोरण जाहीर केलंय. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळे रेपो रेट 6.0 टक्क्यांवरून आता 5.75 टक्क्यांवर आलाय. त्यामुळे आता कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

SSC RESULT 2019 : 10 वीचा निकाल आज नाही, बोर्डाकडून खुलासा

धक्कादायक; बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले!

Loading...

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

OMG ! इंग्लंडमध्ये पसरवली जातेय भारतीय संघाबद्दल 'ही' अफवा

वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.


VIDEO: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...