बँकेतील पैशांना आता कमी व्याज दर? 1 जुलैपासून बदलणार या गोष्टी

बँकेतील पैशांना आता कमी व्याज दर? 1 जुलैपासून बदलणार या गोष्टी

RBIनं Rate of Interest कमी केल्यानं तुमच्या बचत खात्यावरील योजनांवर परिणाम होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : सोमवार अर्थात उद्यापासून बँकेशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. RBIनं ऑनलाईन व्यवहारांशी देखील काही नियमांमध्ये बदल केला आहे. शिवाय, घरगुती गॅसच्या किमतींमध्ये देखील बदल होणार आहे. तर, व्याजदर कमी होणार असल्यानं जमा पैशांवर मिळणारं व्याज देखील कमी होणार आहे.

व्याज दर कमी

केंद्र सरकारनं छोट्या योजनांवरील व्याज दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात 0.10 टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजेच 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज दर कमी असणार आहे.

भारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन!

Online Transitionच्या नियमांमध्ये बदल

Online Transitionला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं RTGS आणि NEFTवर जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. मोठी रक्कम पाठवण्यासाठी RTGS केलं जातं. तर, 2 लाखापर्यंतची रक्कम ही NEFTद्वारे पाठवली जाते. पण, Online Transitionला कोणतेची चार्ज आकारले जाणार नाहीत.

गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणार

दरम्यान, 1 जुलैपासून गॅसच्या किमती वाढणार आहेत. यापूर्वी 1 जून रोजी घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या.

सेव्हिंग खात्याच्या नियमांमध्ये बदल

सेव्हिंग खात्याच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. ठराविक रक्कम खात्यामध्ये ठेवणं बंधनकारक होतं. पण, आता मात्र त्याबाबत सक्ती नसणार आहे. 1 जुलैपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

SBIच्या 42 कोटी ग्राहकांना होणार फायदा

1 जुलैपासून रेपो रेटशी संबंधित होम लोन ग्राहकांना दिलं जाणार आहे. त्यामुळे 1 जुलैपासून मिळणारं होम लोन हे त्यावर आधारित असणार आहे. म्हणजेच ज्यावेळी RBI रेपो रेटमध्ये बदल करेल तेव्हा त्याच आधारावर SBIचा व्याज दर ठरलेला असेल.

गाड्यांच्या किंमती वाढणार

महिंद्रा कंपनीच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये 36000 रूपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे 1 जुलैपासून स्कॉर्पिओ, बोलेरो, एक्सयुवी 500 या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे.

आकाश विजयवर्गीयांची तुरुंगातून सुटका, कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार करून जल्लोष

First published: June 30, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading