RBI ने दिली दिवाळीची भेट! व्याजदर कमी केल्यानं सर्वसामान्यांना होणार फायदा

RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदरात घट केली आहे. या निर्णयामुळे EMI कमी होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 12:15 PM IST

RBI ने दिली दिवाळीची भेट! व्याजदर कमी केल्यानं सर्वसामान्यांना होणार फायदा

मुंबई, 04 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या बैठकीत व्याजदर 0.25 टक्के कमी करून 5.15 टक्के करण्याचा निर्णय घेण्याता आला. या निर्णयाने सर्वसामान्यांना स्वस्तात कर्ज मिळणार आहे. यासोबतच कर्जाच्या हप्त्यातही कपात होण्याच्या आशा आहेत. तज्ज्ञांच्या मते, महागाई दर सध्या RBI ने निश्चित केलेल्या रेषेच्या आत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात घट केली जाण्याची शक्यता होती. याआधी ऑगस्टमध्ये RBI ने व्याजदरात 0.35 टक्के कपात केली होती.

यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वृद्धीदर पाच टक्क्यांवर आला होता. हा वृद्धीदर गेल्या सहा वर्षातला सर्वात निच्चांकी ठरला होता. RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदरात घट केली आहे. आतापर्यंत एकूण 1.10 टक्के व्याजदर कमी झाले आहेत.

रेपो रेट : 0.25 टक्के कमी करून 5.15 टक्के इतका केला.

रिव्हर्स रेपो रेट : 0.25 टक्के कमी केल्याने 4.90 टक्के इतका झाला आहे.

Loading...

सीआरआर 4 टक्क्यांवर स्थिर आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbi
First Published: Oct 4, 2019 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...