मंदीतून सावरण्यासाठी RBIची मोदींना साथ; केंद्राला देणार 1.76 लाख कोटी!

मंदीतून सावरण्यासाठी RBIची मोदींना साथ; केंद्राला देणार 1.76 लाख कोटी!

RBIने पैसे देण्याला मंजूरी दिल्यामुळे मंदीच्या गर्तेत सापडलेल्या केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेत पैशांचा फ्लो वाढविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई 26 ऑगस्ट : हो, नाही म्हणता म्हणता शेवटी रिझर्व्ह बँक (RBI)आपल्या राखीव फंडातले तब्बल 1 लाख 76 हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याच राजी झालंय. RBIच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारची गेल्या कित्येक वर्षांची मागणी मान्य झालीय. यावर अनेक वाद प्रवाद होते. त्यावर विचार करत शेवटी RBIने पैसे देण्याला मंजूरी दिल्यामुळे मंदीच्या गर्तेत सापडलेल्या केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेत पैशांचा फ्लो वाढविण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

गेली काही वर्ष या विषयावर वाद सुरू होतो. RBIच्या राखीव फंडातले पैसे केंद्राला द्यावेत किंवा नाही यावर दोन मतं होती. काही अर्थतज्ज्ञांनी याचं समर्थन केलं होतं तर काही तज्ज्ञांचा याला विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने RBIचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती(Bimal Jalan committees recommendations) नेमली होती. या समितीने सर्वांशी चर्चा करून आपला अहवाल केंद्राला दिला. केंद्र सरकारने तो अहवाल स्वीकारला होता.

RBIच्या राखीव फंडात सध्या रोख आणि सोनं मिळून 9 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे आहेत. यातले 28 टक्के रक्कम RBI केंद्राला देण्यास राजी झाली आहे. सार्वजनिक कर्जाची परतफेड आणि बँकांना मदत देण्यासाठी सरकार या पैशाचा वापर करणार आहे. बँकांना 70 हजार कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी याआधीच केली होती.

'मोदी उत्तम इंग्लिश बोलतात पण....' ट्रंप यांच्या 'या' वाक्यावर मोदींनी दिली टाळी

जागतिक परिस्थिती आणि अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे जगभर मंदीचं सावट आहे. त्याचा परिणाम भारतावरही पडला असून अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतोय. ऑटो आणि टेक्सस्टाईल उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असून हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलीय. RBIच्या या मदतीमुळे आता केंद्राला थोडा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 10:19 PM IST

ताज्या बातम्या