खरं की खोटं? डायनिंग टेबलवरून मांसाच्या तुकड्याने मारली उडी, VIDEO व्हायरल

कल्पना करा, तुम्ही चिकन किंवा मटन खाताय आणि या प्लेटमधला एखादा मांसाचा तुकडा फडफडून उड्या मारायला लागला तर ? तुम्ही म्हणाल, असं कसं होऊ शकतं. पण असं झालं आहे. एका प्लेटमधून मांसाचा तुकडा बाहेर उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. याला लोकांनी नाव दिलंय,झोंबी चिकन.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 08:22 PM IST

खरं की खोटं? डायनिंग टेबलवरून मांसाच्या तुकड्याने मारली उडी, VIDEO व्हायरल

मुंबई, 29 जुलै : कल्पना करा, तुम्ही चिकन किंवा मटन खाताय आणि या प्लेटमधला एखादा मांसाचा तुकडा फडफडून उड्या मारायला लागला तर ? तुम्ही म्हणाल, असं कसं होऊ शकतं. पण असं झालं आहे. एका प्लेटमधून मांसाचा तुकडा बाहेर उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. याला लोकांनी नाव दिलंय,झोंबी चिकन.

हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, तो एडिट केला आहे का, यात इफेक्ट्स वापरले आहेत का याची सध्या चर्चा रंगलीय.

Loading...

सायंटिफिक अमेरिकनमध्ये या व्हिडिओबद्दलचं एक स्पष्टीकरणही आलं आहे. मांसाच्या ताज्या तुकड्यांमध्ये काही पेशी जिवंत असतात. मीठ किंवा सोया सॉसमधल्या सोडियम ऑयन या रासायनिक घटकाला या पेशी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे तो मांसाचा तुकडा हालचाल करतोय, असं वाटतं.

जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा त्याच्या न्यूरॉन्स या पेशी लगेचच काम करणं थांबवत नाहीत. त्या काही काळ तरी जिवंतच असतात. सोडियम आयनशी त्यांचा संपर्क आला तर अशी गंमत पाहायला मिळते. या व्हायरल व्हिडिओमुळे याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

IND vs WI : विराटनं सांगितली टीम इंडियाच्या कोचसाठी पहिली पसंती!

हा व्हिडिओ पहिल्यांदा एका चायनीज सोशल मीडिया साइटवर पोस्ट करण्यात आला. काही न्यूज वेबसाइट्सनी तो चिकनचा तुकडा असल्याचा दावा केला पण हॉंगकाँग न्यूजने दिलेल्या बातमीनुसार ते बेडकाचं मांस आहे.तरीही हा नेमका कुणाच्या मांसाचा तुकडा आहे यावरून वाद सुरू आहे.काही जणांना मात्र हा व्हिडिओ बनावटही वाटतो आहे.

=========================================================================================

ठाण्यातल्या तलावात आढळलं भलंमोठं कासव, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...