अहमदाबाद, 29 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपला. पहिल्या टप्प्यात अनेक हायप्रोफाईल उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यापैकी एक म्हणजे क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा. रिवाबा सध्या तिचे सासरे अनिरुद्ध सिंग जडेजा यांच्यामुळे चर्चेत आहे. वास्तविक, रवींद्र जडेजाच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनिरुद्ध सिंग जडेजा जनतेला रिवाबाला मतदान न करण्याचे आवाहन करत आहे. त्याचवेळी ते काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
त्याचवेळी रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा हिनेही तिची वहिनी रिवाबाविरोधात आघाडी उघडली आहे. नयनाबा जामनगर जागेवर काँग्रेससाठी मतांचे आवाहन करत आहेत. नयनाबा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने दिग्गज आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांचे तिकीट कापून रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. वास्तविक, न्यूज18 व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपला.
Ravindra Jadeja's father appealed the people of Jamnagar to vote in the favour of Congress candidate. Ravindra Jadeja's wife is also contesting from the same seat with BJP's ticket. pic.twitter.com/BopuwnfQct
— Ankit Mayank (@mr_mayank) November 29, 2022
गुरुवारी मतदान होत असलेल्या दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांसाठी आणि कच्छ-सौराष्ट्र विभागातील 89 जागांसाठी तब्बल 788 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात परंपरागतपणे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. परंतु, यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रूपाने तिसरा पक्ष रिंगणात आहे, ज्याने एकूण 182 जागांपैकी 181 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
वाचा - काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण; म्हणून 24 तासांत माफीनामा
पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसचे 89-89 उमेदवार आणि 'आप'चे 88 उमेदवार रिंगणात आहेत. सुरत (पूर्व) मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पहिल्या टप्प्यात भाजपने नऊ महिला, काँग्रेसने सहा आणि आपने पाच उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला उमेदवार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Ravindra jadeja