खबरदार!, भारतीयांचा फेसबुकवरचा डेटा चोरला तर..,रवीशंकर प्रसाद फेसबुकवर भडकले

खबरदार!, भारतीयांचा फेसबुकवरचा डेटा चोरला तर..,रवीशंकर प्रसाद फेसबुकवर भडकले

सध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे

  • Share this:

21 मार्च: भारतीय लोकांची कुठली ही माहिती फेसबुकवरून चोरी केल्याचं खपवून घेतलं जाणार नाही, वेळ पडल्यास आपण फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला ही समन्स पाठवण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी सक्त ताकीदच भारताचे कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी फेसबुकला दिलीये.

सध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतात 20 कोटीहून अधिक फेसबुक युजर्स आहेत. या सर्वांची माहिती, डेटा राजकारणासाठी देशाबाहेर फेसबुक मार्फत नेला जाण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. यामुळे भारताच्या निवडणुकाही प्रभावित होऊ शकतात. 2016 साली अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तसंच या डेटाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होतोय.

पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ही भूमिका घेतली आहे. आपण माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो पण चोरीचे नाही असंही यावेळी प्रसाद यांनी सांगितलं. तसंच या भारतातून लपून छपून होणाऱ्या डेटा चोरी मागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला.

आता या पार्श्वभूमीवर काँग्रेस काय भूमिका घेत आणि फेसबुक काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: March 21, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या