तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मांडलं,एमआयएम आणि मुस्लिम लीगचा विरोध

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मांडलं,एमआयएम आणि मुस्लिम लीगचा विरोध

रविशंकर प्रसाद म्हणाले, ' हे विधेयक म्हणजे महिलांचा सन्मान आहे.' बीजेडी, आरजेडी आणि एआईएमआईएमचे प्रमुख ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध केलाय.

  • Share this:

28 डिसेंबर : तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज लोकसभेत मांडलं. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं. या विधेयकानुसार तिहेरी तलाक घेणाऱ्याला 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली गेलीय. रविशंकर प्रसाद म्हणाले, ' हे विधेयक म्हणजे महिलांचा सन्मान आहे.' बीजेडी, आरजेडी आणि एआईएमआईएमचे प्रमुख ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध केलाय.

सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवलं होतं. या विधेयकाला All India Muslim Personal Law बोर्डाचा विरोध कायम आहे.तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा तुम्ही आणणार का, आणलात तर ते बरं होईल, असं कोर्टानं सुचवलं होतं. या विधेयकानुसार, तोंडी तलाक देणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक

- मुस्लिम महिला (विवाहसंबंधी हक्कांचं संरक्षण) विधेयक 2017

- तोंडी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) कायद्यानं गुन्हा

- तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद

- तिहेरी तलाक दिलेल्या महिलेला पोटगीची तरतूद

- महिला आपल्या मुलांचा ताबा मिळण्याची मागणी करू शकते

- मुलांच्या ताब्यावर न्याय दंडाधिकारी देणार निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading