अंडरवर्ल्‍ड डॉन रवी पुजारीला दणका, 15 वर्षानंतर आणलं भारतात

अंडरवर्ल्‍ड डॉन रवी पुजारीला दणका, 15 वर्षानंतर आणलं भारतात

तब्बल 15 वर्षानंतर त्याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आलंय. तो एवढी वर्ष सुरक्षा यंत्रणांना चकवा देत होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अखेर भारतात आणण्यास भारतीय तपास यंत्रणांना यश आलंय. सोनेगलमधून त्याला सकाळी नवी दिल्लीत आणण्यात आलं आणि तेथून थेट बंगळुरुला नेण्यात आलं. त्याला सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. RAW च्या मदतीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी त्याला पश्चिम आफ्रिकेतल्या सेनेगल इथे अटक केलं होतं. त्यासाठी रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये गेले होते. त्याच्या प्रत्यापर्णाची तयारी पूर्ण करून भारतात आणण्यात आलं. रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता अधिकाऱ्यांनी केली आणि त्याला भारतात आण्याचा मार्ग मोकळा झाला. तब्बल 15 वर्षानंतर त्याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आलंय. तो एवढी वर्ष सुरक्षा यंत्रणांना चकवा देत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.

पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की, तो एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाच्या रेस्टॉरंट्स चालवितो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

धक्कादायक! प्रसिद्ध कंपनीच्या ताकामध्ये आढळले बुरशीसारखे पदार्थ

जून 2019 मध्ये झाला होता फरार

गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी फरार झाला होता. त्याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगल येथे भारतीय एजन्सीच्या इनपुटवरून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा आफ्रिकी देशात सेनेगलमध्ये राहत होता. भारतीय एजन्सी सतत त्याच्यावर नजर ठेवत होती. आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

रवी पुजारीवर कर्नाटक-महाराष्ट्रात 98 प्रकरणं

रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि अगदी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनाही हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरूद्ध कर्नाटक आणि मुंबई इथे 98 खटले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणींनी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस तक्रार दिली होती.

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सुरू होती दारू पार्टी LIVE VIDEO

जिग्नेश म्हणाले होते की, त्यांना फोन कॉल्स आणि मेसेज करून धमकवण्यात आलं होतं आणि धमकी देणारा रवी पुजारी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. जिग्नेश यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की त्याचं नाव रवी पुजारी आहे आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याने म्हटलं होतं की मेवाणींना गोळी मारू शकतो.

First published: February 24, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading