मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहनापूर्वीच रावण बेपत्ता, शोधाशोध करून नागरिक हैराण...पोलीसही निरुत्तर

दहनापूर्वीच रावण बेपत्ता, शोधाशोध करून नागरिक हैराण...पोलीसही निरुत्तर

आता कसं होणार रावणाचं दहण?

आता कसं होणार रावणाचं दहण?

आता कसं होणार रावणाचं दहण?

  • Published by:  Meenal Gangurde
लखनऊ, 25 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध अलीगढच्या सरयू पाल रामलीला मैदानात आज दसऱ्याच्या दिवशी शांतता पसरली आहे. त्याचं झालं असं की दहन होणाऱ्या रावणाचा पुतळा आज सकाळी बेपत्ता झाला. ही गोष्ट तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल. मात्र समितीचे सदस्यही या गोष्टीमुळे हैराण झाले आहेत. सांगितले जात आहे की, रविवारी रावणाच्या पुतळ्याला घेऊन कारागिर फरार झाला. तर मैदानातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा ते ड्यूटीवर आले तेव्हा मैदानात पुतळा नव्हताच. श्री रामलीला गोशाला कमिटीची परंपरा कायम ठेवण्यासाठी यावेळी संगीतमय रामायण पाठ करण्यात आला होता. विजयादशमीच्या दिवशी रामलीला मैदानात रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्लान होता. मात्र आज या मैदानात शांतत पसरली आहे. सध्या रावणाच्या पुतळ्याचा शोध सुरू आहे. आज सकाळीही कमिटीच्या सदस्यांची बैठक झाली. मात्र रावणाचा पुतळा कुठेच सापडला नाही. ज्या कारागिराला हे काम दिलं होतं, तो देखील घर सोडून कुठे तरी निघून गेला आहे. शनिवारी स्थानिक पोलिसांनी रावणाच्या पुतळ्याच्या दहनाच्या नोटीसमुळे गोंधळ उडाला होता. त्या नोटीसीनंतर पदाधिकारी नाराज झाले होते. मात्र असे असले तरी पुतळ्याचे दहन रामलीला मैदानात करण्यावर सदस्य निश्चित होते. प्रशासनाने कोरोना संक्रमणाच्या बचावासाठी नियमांचे पालन करीत रावणाचे दहन करण्याची परवानगी दिली आहे. हे ही वाचा-लग्नसंस्थेवर विश्वास नाही, केवळ व्हिसा मिळविण्यासाठी केलं लग्न - राधिका आपटे जनता विचारतेय, कुठेय रावण? रामलीला मैदानात मुलं, महिला आणि तरुणी फिरायला येत आहेत. यादरम्यान लोकांना रावणचा पुतळा दिसत नाही. त्यामुळे अनेकजण पोलीस कर्मचाऱ्यांना रावणाचा पुतळा कुठे आहे? अशी विचारणा करीत आहेत. पोलीस कर्मचारीही यावर निरुत्तर आहेत. त्यांनी सांगितले की जेव्हा ते सकाळी येथे ड्यूटीवर आले तेव्हा रावणाचा पुतळा मैदानात नव्हताच.
First published:

पुढील बातम्या