अरे देवा...उंदरांनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या 50 हजारांच्या नोटा!

पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा उंदरांनी फस्त केल्या आणि एक शेतकरी कंगाल झाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 03:20 PM IST

अरे देवा...उंदरांनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या 50 हजारांच्या नोटा!

चेन्नई 22 ऑक्टोंबर : उंदराचे प्रताप तसे आपल्याला काही नवे नाहीत. घर असो की चोवीस तास ACत असणारे ऑफिस, कार असो की रेल्वे अशा प्रत्येक ठिकाणी उंदरांचा धुमाकूळ ठरलेला असता. महानगरपालिकेत किंवा रेल्वे खात्यात खास उंदीर पकडण्यासाठी एक वेगळा विभाग असतो आणि त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. यात सगळ्यात जास्त फटका बसतो तो शेतकऱ्यांना मातील पेरलेलं बियाणं असो की पीक आल्यानंतर घरात साठवून ठेवलेलं धान्य. या प्रत्येक ठिकाणी उंदारांचा धोका सर्वात जास्त असतो. आणि या उंदारांना पकडणही सर्वात जास्त जिकरीचं असते. चेन्नईजवळ राहणाऱ्या एका शेतकऱ्याला उंदरांनी कंगाल करून टाकलं. साठवलेले सगळेत पैसे गेल्याने आता करायचं काय असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झालाय.

'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला

त्याचं असं झालं की, तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यातल्या वेलिंगडू या खेड्यात रंगराजन हे शेतकरी राहतात. त्यांनी मोठ्या कष्टाने शेतात धानाचं पीक घेतलं. हे धान आल्यानंतर त्यांनी ते बाजारपेठेत विकलं. त्यातून त्यांना 50 हजारांची घसघशीत रक्कम मिळाली. त्यांना पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा मिळाल्या होत्या. दिवळी जवळ आल्याने हे पैसे खरेदीसाठी लागतील त्यामुळे त्याने ते पैसे बँकेत न ठेवता आपल्या छोट्या घरातच एका थैलीत ठेवले होते.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं 'उदयनराजे स्टाईल' सेलिब्रेशन, काढली विजयी मिरवणूक

काही दिवसांनी त्यांना जेव्हा पैशांची गरज पडली तेव्हा रंगराजन यांनी थैली उघडली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त नोटा उंदरांनी कुरतडल्या होत्या. नव्या कोऱ्या 500 आणि 2000च्या नोटा कुरतडल्याने आता काय करायचं या चिंतेने रंगराजन यांना ग्रासलंय. मातीचं घर आणि कुडाच्या भिंतींमुळे उंदरांनी पैशावर डल्ला मारला होता.

Loading...

मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

या नोटा बदलून मिळतील या आशेने रंगराजन हे बँकेतही जाऊन आले मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कुरतडलेल्या आणि अर्ध्या खालल्लेल्या नोट्या परत बदलून मिळणार नाहीत असं बँकेनेत्यांना सांगितलंय. कारण त्यातल्या अनेक नोटांचा नंबर असलेला भाग उंदराच्या पोटात गेला होता. त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न रंगराजन यांना पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...