S M L

हे पाहून खाणं सोडून द्याल! उंदरांचा विमानतळावरील कँटीनमध्ये धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग लॉटमध्ये हे कँटीन आहे. विमानतळावर येणारे कॅब चालक या कँटीनमध्ये जेवायला येतात.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:20 PM IST

हे पाहून खाणं सोडून द्याल! उंदरांचा विमानतळावरील कँटीनमध्ये धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

25 एप्रिल : हैदराबादमधल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कँटीनमधला अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. टॅक्सी चालकांसाठी ज्या कँटीनमधून अन्न दिलं जातं तिथे उंदरांचा अक्षरश: धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. या कँटीनच्या स्वयंपाक घरातील भांड्यांवरच नाही तर अन्नपदार्थांवरदेखील उंदीर ताव मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

ट्विटवर एमबीटीचे प्रवक्ते अमजेद अल्ला खान यांनी हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग लॉटमध्ये हे कँटीन आहे. विमानतळावर येणारे कॅब चालक या कँटीनमध्ये जेवायला येतात.

कँटीनमधल्या स्वयंपाक घराची अवस्था अत्यंत वाईट असून यामुळे येथे जेवणाऱ्या चालकांच्या आरोग्यास हानी पोहोचत आहे. त्यामुळे त्वरित हे कँटीन चालवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद पोलिसांनीदेखील या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश विमानतळावरील अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कँटीनच्या मालकावर कारवाई करण्यात आली असून स्वयंपाक घराची देखील स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 08:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close