'दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यू पेक्षा, अपघाती मृतांचं प्रमाण सर्वात जास्त'

'दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यू पेक्षा, अपघाती मृतांचं प्रमाण सर्वात जास्त'

देशभरात वेगवेगळ्या कारणांनी होणारे अपघाती मृत्यू हे कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यू पेक्षा जास्त असल्याचं धक्कादायक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय.

  • Share this:

मुंबई, 8 डिसेंबर : देशभरात वेगवेगळ्या कारणांनी होणारे अपघाती मृत्यू हे कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यू पेक्षा जास्त असल्याचं धक्कादायक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. वर्षभरात देशभरात अपघातांमुळे सुमारे दीड लाख लोकांचे मृत्यू होतात आणि त्याहून चिंताजनक म्हणजे या अपघाती मृत्यूंमध्ये 60 टक्के इतकं प्रमाण हे 18 ते 35 वयोगटाततील तरुण मुलांचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.

देशभरात डिसेंबर महिन्यात रस्ते सुरक्षेबाबत जागृती केली जाते, रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. मात्र, त्याचा भारतातल्या रस्ते सुरक्षेवर आणि अपघातांवर किती परिणाम होतो असा प्रश्न आहे. याचं कारण आता खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच धक्कादायक निरीक्षण नोंदवलंय. त्यामुळे रस्ते सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होण गरजेचं आहे. यावर उपाययोजना म्हणून पुणे पोलिसांनी कारवाईसोबतच आता वाहनचालकांना समुपदेशनाचे धडे द्यायला सुरुवात केली असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली.

2016 मध्ये झालेल्या अपघाती मृत्यूची कारण शोधल्यानंतर काही महत्वपूर्ण आकडेवारी समोर आलीये. सीट बेल्ट न बांधल्याने 5,838 जणांना आपले प्राण गमवावे लागले, हेल्मेट न घातल्यामुळे तब्बल 10,138 जणांचा जीव गेला. बेदरकार वाहन चालविल्यामुळे 17938 जणांचा जीव गेला, वाहन चालवताना मोबाईलचा वपर करत असताना घडलेल्या अपघातांत 2138 जणांचा बळी गेला, सिग्नल तोडल्याने आणि लेन कटिंगवर 4,055 जणांनी आपले प्राण गमावले. विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यामुळे घडलेल्या अपघातांत 5,075 जणांचे प्राण गेले. दारूच्या नशेत 6,131 जणांना आपला जीव गमावला, ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करताना 9,563 जणांचा मृत्यू झाला. तर सर्वाधिक म्हणजे 73,896 जण हे अतिवेगामुळे मृत्युमूखी पडल्याचं स्पष्ट झालंय.

अपघाती मृत्यूचं वास्तव...

- देशभरात अपघाती मृत्यूच्या प्रमाणात गेल्या दहा वर्षात 30 % नी वाढली

- 2016 मध्ये देशभरात 1.50 लाख लोकांचा अपघाती मृत्यू

- 2017 मध्ये देशभरात 1.47 लाख लोकांचा अपघाती मृत्यू

- अपघाती मृत्यूमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण 60% इतकं

 लेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठार

First published: December 8, 2018, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading