Home /News /national /

वीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांवर झाली कारवाई

वीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांवर झाली कारवाई

या वह्यांच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठावर सावरकरांचे छायाचित्र, त्यांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्यांबरोबर NGO च्या पदाधिकाऱ्यांचेही छायाचित्र होते

    रतलाम, 16 जानेवारी: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सरकारी मलवासा शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेल्या वह्यांचे वाटप केल्याकारणाने शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. वीर सावरकर हितार्थ जनकल्याण समितीद्वारे (NGO) या वह्यांचे वाटप करण्यात आले होते. या वह्यांच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठावर सावरकरांचे छायाचित्र, त्यांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्यांबरोबर NGO च्या पदाधिकाऱ्यांचेही छायाचित्र होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या समितीने शाळेत वह्यांचे वाटप केले त्याचे पदाधिकारी हे भाजप समर्थक आहेत. त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर तत्संबंधित माहिती आणि छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले होते. कमलनाथ विचार सद्भावना मंचाच्या जिल्हा अध्यक्षाने हे फोटो पाहून यासंबंधितची माहिती काँग्रेसच्या आयटी सेलला दिली. ही माहिती भोपाळचे कलेक्टर आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राचार्य केरावत यांना परवनागीशिवाय शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील कारणं विचारलं. यावर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. अनेक ठिकाणांहून विरोध शैक्षणिक ठिकाणं किंवा शाळांमध्ये विविध संस्थामार्फत वह्या वाटप वा तत्सम कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. त्यामुळे प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित करणे आणि हे प्रकरण राजकारणाशी जोडणे योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करीत आलो आहे. यापुढेही करीत राहिन. जर सरकारला माझा निर्णय चुकीचा वाटत असेल तर पुढील कारवाईसाठी मी तयार आहे. अनेक स्वयंसेवी संस्था शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्यांचा प्रकल्प समाज व विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. - आरएन केरावत, प्राचार्य (सरकारी हायस्कूल, मलवासा)
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Swatantryaveer savarkar

    पुढील बातम्या