मराठी बातम्या /बातम्या /देश /

फेक मेसेजवरुन रतन टाटा पुन्हा चिडले, फोटो शेअर करीत व्यक्त केली चिंता

फेक मेसेजवरुन रतन टाटा पुन्हा चिडले, फोटो शेअर करीत व्यक्त केली चिंता

सध्या देशभरात अशा स्वरुपाच्या फेक संदेशामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर वेळीच नियंत्रण आणणं आवश्यक आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 3 मे : सोशल मीडियाच्या (Social Media) युगात कोणताही संदेश व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मात्र नेहमीच त्याची विश्वासार्हता असतेच असं नाही. दिग्गज उद्योगती रतन टाटा (Ratan Tata) यांना पुन्हा एकदा या फेक मेसेजमुळे (Fake Massage) मनस्ताप सहन करावा लागला आहे. सध्या सोशल मीडियावर न्यूजपेपरच्या कात्रणच्या स्वरुपात रतन टाटा यांच्या फोटोसह एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिले आहे की, 2020 हे जिवंत राहण्याचं वर्ष आहे. यावर्षात लाभ व हानीचा फार विचार करू नये. स्वप्न आणि योजनांबद्दल चर्चा करू नये. या वर्षी स्वत:ला जिवंत ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवित राहणं हे लाभाप्रमाणे आहे. यावर रतन टाटा यांनी राग व्यक्त केला. त्यांनी हा संदेश ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, हे मी लिहिलेलं नाही. जितक्यांदा शक्य होईल तितक्या वेळा मी ही फेक न्यूज असल्याचे सांगेन. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही न्यूज स्त्रोत तपासून घ्या. कोणताही कोट माझ्या फोटोपुढे लावला म्हणजे ते मी म्हटंल आहे असं सिद्ध होत नाही. यापूर्वीही त्यांना अशाच फेक फोटोचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही त्यांनी लोकांना मॅसेजचा स्त्रोत तपासून घेण्याचं आवाहन केलं होतं. अशाप्रकारे मोठ्या व्यक्तींच्या नावावर चुकीचा संदेश पसरवला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. संबंधित -कोरोना योद्ध्याने बेवासर मृतदेहाला दिला खांदा, कर्तव्य पार पाडत दिली प्रेरणा घरात सतत होती मद्यपींची गर्दी, मात्र गरीबीवर मात करीत मुलाने रचला नवा इतिहास संपादन - मीनल गांगुर्डे
First published:

Tags: Ratan tata, Social media

पुढील बातम्या