नवी दिल्ली, 25 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या तजेल चेहऱ्यामागचं रहस्य मुलांना सांगितलं. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या तजेल चेहऱ्यामागचं रहस्य काय आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मोदींना दिेलेलं उत्तर मुलांना सांगितलं. मला खूप घाम येतो. त्या घामामुळे मालिश होते आणि चेहरा चमकतो आणि तजेल होतो. प्रत्येकानं दिवसातून 4 वेळा घाम येईल एवढं काम करायला हवं. असंही पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तुम्हाला घाम येतो का? असा प्रश्नही त्यांनी मुलांना विचारला. तुम्ही दिवसातून एकदाम घाम येण्याएवढेतरी कठोर परिश्रम करायला हवेत असंही ते म्हणाले.
यंदा 49 मुलांची राष्ट्रीय बाल शौर्य आणि समाजसेवा केलेल्या मुलांचा सन्मान कऱण्यासाठी निवड झाली होती. यावेळी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत संवाद साधला. यावेळी मुलांच्या मनातील प्रश्नांना मोदींनी दिलखुलासपणे उत्तर दिली आणि त्यासोबतच मुलांना मार्गदर्शनही केलं. इतकं काम असूनही तुम्हाला आईची आठवण येत नाही का? असा प्रश्नही एका मुलानं विचारला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी एक स्मित हास्य करून उत्तर दिलं, मला आईची आठवण आली की माझा थकवा दूर पळून जातो. त्यावेळी मी थकलेल्याची आठवण होत नाही. उलट जास्त काम करण्याची ऊर्जा मिळते. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुलांना दैनंदिन जीवनातील काही गोष्टीही सांगितल्या. यासोबतच मुलांनी दाखवलेलं हे धाडस मी सोशल मीडियावर शेअर कऱणार आहे. त्यातून इतर मुलांना प्रेरणा मिळेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.
Interacting with recipients of Rashtriya Bal Puraskar, 2020. Watch. https://t.co/aMwRIevyIf
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांसोबत संवाद साधला. त्यावेळी काही गमती-जमती सांगितल्या. यासोबतच दैनंदिन जीवनातील काही चांगल्या गोष्टी या लहानपणापासून पाळायला हव्यात, काही सवयी अंगवळणी पडल्या तर त्याचा फायदा अधिक होतो हे त्यांनी मुलांना समजवलं. यासोबत मुलांनी केलेल्या कामाचं आणि धाडसाचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi news, Pm narendra mdi