राष्ट्ररक्षासमं व्रतम्...पंतप्रधान मोदींनी केलं राफेलचं स्वागत; अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा

राष्ट्ररक्षासमं व्रतम्...पंतप्रधान मोदींनी केलं राफेलचं स्वागत; अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा

भारतीय सैन्याची ताकद आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी खास असे सुपर फायटर राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी भारतात दाखल झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जुलै : आज भारतीय वायूसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज पहिल्या टप्प्यातील राफेल लढाऊ विमानांनी भारतात सुरक्षित लँडिंग केलं. याचा व्हिडीओ शेअर करीत पंतप्रधानांपासून संरक्षणमंत्र्यांनी अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं.

मोदींनी संस्कृतमध्ये एक श्लोक ट्विट केला आहे - राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। नभः स्पृशं दीप्तम्.. स्वागतम्! राफेल विमानाची पहिली तुकडी सकाळी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती तसंच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती.

जु फ्रान्सकडून खरेदी केलेले राफेलचे लढाऊ विमानं हरियाणातील अंबाला एअरबेसवर उतरले आहेत. वायूसेनाचे प्रमुख एअर चीफ मार्शन आरकेएस भदौरिया यांनी अंबालामध्ये विमानांचं स्वागत केलं. सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी कऱण्यात आली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील.

Published by: Meenal Gangurde
First published: July 29, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या