• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक संपन्न; बैठकीत काय ठरलं?

शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक संपन्न; बैठकीत काय ठरलं?

दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचाही सहभाग

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जून: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रमंच (Rashtra Manch) संघटनेने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय मंचच्या नेत्यांव्यतिरिक्त विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनीही राष्ट्र मंच अंतर्गत भाग घेतला. जाणून घेऊयात बैठकीत काय ठरलं? या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात बैठकीत काय चर्चा झाली आणि काय ठरलं?. बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा?  माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते.  राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती. शरद पवारांच्या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण का नाही? राऊतांनी केला खुलासा बैठकीत उपस्थित नेत्यांची नावे शरद पवार सुप्रिया सुळे यशवंत सिन्हा पवन वर्मा डी राजा ओमर उब्दुल्लाह जस्टिस ए पी शाह जावेद अख्तर अॅडवोकेट माजिद मेमन खासदार वंदना चव्हाण सुधेंद्र कुलकर्णी अरूण कुमार, अर्थशास्त्रज्ञ निलोलपाल बासू, माजी खासदार सीपीएम जयंत चौधरी घनश्याम तिवारी, समाजवादी पार्टी बिनॉय विश्वास, खासदार सुशील गुप्ता, आम आदमी पार्टी के. सी. सिंग
Published by:Sunil Desale
First published: