'तो' एकटा होता आणि 'ते' तिघे, वाघांच्या 'गँगवार'चा थरारक व्हिडिओ

'तो' एकटा होता आणि 'ते' तिघे, वाघांच्या 'गँगवार'चा थरारक व्हिडिओ

गळुरूमधील बैनरघाटा जैव पार्कमध्ये 3 बंगाल टायगरर्सनी पांढऱ्यावर वाघावर हल्ला चढवल्याची घटना समोर आलीये.

  • Share this:

23 सप्टेंबर : बंगळुरूमधील बैनरघाटा जैव पार्कमध्ये 3 बंगाल टायगरर्सनी पांढऱ्यावर वाघावर हल्ला चढवल्याची घटना समोर आलीये. या हल्ला इतका भीषण होता की जखमी श्रेयस नावाच्या पांढऱ्या वाघाचा मृत्यू झालाय.

ही घटना 17 सप्टेंबर रोजी घडली होती. 3 बंगाल टायगर्सनी अमर नावाच्या पांढऱ्या वाघावर हल्ला चढवला होता. अमर वाघाने या तिन्ही वाघांशी झुंज देऊन आपली सुखरूप सुटका करून घेतली. पण, थोड्या वेळानंतर या तिन्ही वाघांनी नऊ वर्षांच्या श्रेयश नावाच्या पांढऱ्या वाघाला टार्गेट केलं. तिन्ही वाघांनी श्रेयशवर हल्ला चढवला. तिथे जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी हल्लेखोर तिन्ही वाघांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.

जवळपास अर्ध्या तासानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी वाघाला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या पांढऱ्या वाघाचा 20 सप्टेंबरला मृत्यू झाला. पार्कमधील अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली असून नियमांनुसार पांढऱ्या वाघाला इतर वाघांपासून वेगळं ठेवलं जात असतं. या प्रकरणात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार अशी माहिती पार्कच्या व्यवस्थापकांनी दिली.

First published: September 23, 2017, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading