मुलींना चांगले संस्कार दिले तरच बलात्काराच्या घटना थांबतील, भाजप नेत्याचे वक्तव्य

'सुरक्षा पुरवणे जर सरकारची जबाबदारी असेल तर प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हा त्यांचा धर्म आहे'

'सुरक्षा पुरवणे जर सरकारची जबाबदारी असेल तर प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हा त्यांचा धर्म आहे'

  • Share this:
    नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळं उधळली. 'रामराज्य सुरू आहे, पण अशाही रामराज्यात बलात्काराच्या घटना घडत आहे असा सवाल सुरेंद्र सिंह यांना विचारण्यात आला होता, त्यावर सिंह म्हणाले की, 'मी आमदार तर आहेच, पण एक शिक्षक आहे. अशा घटना या संस्कारामुळे थांबू शकतील, त्या काही सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाही. प्रत्येक आई-वडिलांचा धर्म आहे की, आपले बोलणे आणि आपल्या मुलींना चांगला  संस्कारी वातावरणात राहण्याचा, चालण्याचा आणि शालीन व्यवहार शिकवण्याची गरज आहे. ' 'हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सुरक्षा पुरवणे जर सरकारची जबाबदारी असेल तर प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हा त्यांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कोणीही समोर येणार नाही' असंही सुरेंद्र सिंह म्हणाले. निर्भयानंतर हाथरस बलात्कार प्रकरणाचा खटला सीमा कुशवाह लढणार दरम्यान, प्रदेशातील हाथरस (Hathras) मधील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या झालेल्या तरुणीची केस दिल्लीतील निर्भयाची वकील सीमा समृद्धी कुशवाह (Seema Samriddhi Kushwaha) लढणार आहे.  सीमा कुशवाह यांनी न्यूज 18 सोबत बातचीत करताना हे सांगितले. दोन दिवसांपूर्वी त्या हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांने केस घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या त्या या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी करीत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published: