Home /News /national /

बलात्काराचा प्रयत्न करणारा थेट रुग्णालयात, युवतीने दिली आयुष्यभराची शिक्षा

बलात्काराचा प्रयत्न करणारा थेट रुग्णालयात, युवतीने दिली आयुष्यभराची शिक्षा

प्रसिद्ध लेखक, नाटककार जयवंत दळवींच्या 'पुरुष' या नाटकातही त्या पुरुषाची अशीच अवस्था होते

    नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने देश हादरुन गेला होता. या दोषींना फाशी देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार लवकरच निर्भयाचा दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मात्र अनेक प्रकरणात बलात्कारांना काही वर्षांची शिक्षा होते. आणि त्यानंतर ते मुक्तपणे फिरू शकतात. मात्र ज्या महिलेवर बलात्कार झालेला असतो ती जखम तिला आयुष्यभरासाठी वागवावी लागते. मात्र पाकिस्तानातील एका महिलेने बलात्कार करणाऱ्याला अशी अद्दल घडवली आहे की आयुष्यभर तो पुन्हा असं कधी करूच शकणार नाही. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा युवतीने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला आहे. सध्या आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना पंजाबमधली आहे. हा पंजाब प्रांत पाकिस्तानातील आहे.  28 वर्षीय युवकाने पाकिस्तानातील पंजाब प्रातांतील फैसलाबाद शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. युवतीला ही गोष्ट सहन झाली नाही. य़ुवतीने त्या तरुणाला विरोध करण्याचा बराचं प्रयत्न केला. जिल्हा पोलीस एजन्सीचे अधिकारी मोहम्मद इलियान यांनी सांगितले, युवक महिलेवर जबरदस्ती करीत असताना तिने स्वयंपाकघरात धाव घेतली. तेथून तिने भाजी कापण्याचा चाकू घेतला आणि युवकाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. यानंतर तिने पोलिसांना फोन केला. आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आणि पोलिसांसमोर स्वत:ला सरेंडर केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी युवकाला फैसलाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात भर्ती केलं. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. आरोपी व पीडित युवती एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. एएसपी जारनवाला बिलाल सुरेहरी यांनी सांगितले की, आरोपी युवक दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता. तो महिलेला शेवटचं भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्याने युवतीकडे शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. युवतीने याला नकार दिला. त्यानंतर मात्र तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. आपल्या बचावासाठी युवतीने युवकाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. अन्य बातम्या निर्भयाच्या नराधमांना एकत्र फाशी, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय Video Viral: लग्नाआधीच नवरीनं मांडवात दिलं नवऱ्याला सरप्राईज, वऱ्हाडी झाले घायाळ
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pakistan, Rape case

    पुढील बातम्या