भयंकर ! बलात्कारानंतर सहावीची विद्यार्थिनी राहिली गरोदर

भयंकर ! बलात्कारानंतर सहावीची विद्यार्थिनी राहिली गरोदर

Rape In Madhya Pradesh : सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी 45 वर्षीय व्यक्तीच्या वासनेची शिकार झाली आहे.

  • Share this:

भोपाळ, 21 जून : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीच्या व्यक्तीनं सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. टीटी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. सहा महिन्यापूर्वी सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी या व्यक्तीच्या वासनेची शिकार झाली. गुरूवारी अचानक मुलीच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासाअंती मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. नातेवाईकांना या घटनेमुळे धक्का बसला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपीला ठोकल्या बेड्या

पीडितेच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवराज यादव या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेकडे चौकशी केल्यानंतर डिसेंबर 2018मध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. नराधम आरोपी हा परिसरातील राहणारा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपीचं आहे शेंगदाण्याचं दुकान

शिवराज यादव हा आरोपी तीन मुलं, सून आणि पत्नीसोबत राहतो. त्याचं शेंगदाण्याचं दुकान आहे. शिवराज यादवच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर तो पीडित मुलीश दृष्कृत्य करत असे. डिसेंबर 2018मध्ये शेंगदाणे देण्याच्या निमित्तानं त्यानं पीडितेला बोलावलं आणि बलात्कार केला. शिवाय, झालेल्या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीनं पीडितेला दिली. त्यामुळे पीडित मुलीनं घाबरून याबद्दल कुणालाही माहिती दिली नाही.

महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा

मध्य प्रदेशमध्ये यापूर्वी मागील 15 दिवसामध्ये देखील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वाघाची उंच उडी पाहून पर्यटक आवाक, VIDEO व्हायरल

First published: June 21, 2019, 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading