• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अखेर काँग्रेसच्या आमदार पुत्राला अटक; बलात्कार प्रकरणी 6 महिन्यांपासून होता फरार

अखेर काँग्रेसच्या आमदार पुत्राला अटक; बलात्कार प्रकरणी 6 महिन्यांपासून होता फरार

काँग्रेस आमदाराच्या आरोपी मुलाने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार केला होता. सहा महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

 • Share this:
  इंदूर, 26 ऑक्टोबर: यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आरोपी आमदार पुत्राने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित तरुणीनं लग्नासाठी विचारलं असता, आरोपीने पीडितेशी लग्नाला नकार देत तिची फसवणूक केली होती. याप्रकरणी पीडित तरुणीने काँग्रेस आमदार पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला (absconding from last 6 months) होता. यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused son of congress MLA arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. करण मोरवाल असं अटक (Karan Morwal) केलेल्या काँग्रेस आमदार पुत्राचं नाव आहे. तो बडनगरचे काँग्रेस आमदार (Congress MLA) मुरली मोरवाल (Murli Morwal) यांचा मुलगा आहे. आरोपी करणवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण बरंच तापलं होतं. तसेच राजकीय दबावामुळे पोलीस कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोप पोलिसांवर झाला होता. पण अखेर सहा महिन्यांनंतर आरोपी करण मोरवाल याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हेही वाचा-विवाहबाह्य संबंधातून मॉडेलच्या हत्येचा कट; भररस्त्यात घातल्या गोळ्या आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण याने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. बलात्कार केल्यानंतर आरोपी करणने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित मुलगी इंदूरची रहिवासी आहे. पीडितेनं गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी करण बराच काळापासून फरार होता. आरोपी करणला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची घोषणा देखील केली होती. पोलिसांनी सुरुवातीला 10 हजार, नंतर 15 हजार आणि अलीकडेच 25 हजार रुपयांची घोषणा केली होती. हेही वाचा-काका खाऊला पैसे देतायेत समजून 7 वर्षांची चिमुरडी गेली पुढे, झाली भयंकर अवस्था आरोपी नेपाळला पळून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. अखेर सहा महिन्यानंतर महिला पोलिसांनी आरोपीला मक्सी येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीला अटक न झाल्यामुळे पीडित तरुणीने राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची तीन वेळा भेट घेतली होती. नरोत्तम मिश्रा यांनी आरोपीला लवकरच अटक करू, असं आश्वासन पीडितेला दिलं होतं. तसेच आरोपीकडून दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
  Published by:News18 Desk
  First published: