काश्मीर खोऱ्यात 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराविरोधात स्थानिक तीव्र स्वरूपात आंदोलन करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 05:48 PM IST

काश्मीर खोऱ्यात 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या

श्रीनगर, 14 मे : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराविरोधात स्थानिक तीव्र स्वरूपात आंदोलन करत आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काश्मीर खोऱ्यात आजही हिंसक निदर्शनं सुरू आहेत. सोमवारी (13 मे)देखील येथे हिंसक निदर्शनं झाल्यानं येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यामध्ये एका अधिकाऱ्यासहित 40 हून अधिक जवान आणि सात नागरिकही जखमी झाले होते.

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात कित्येक ठिकाणी तरुणांनी आंदोलन करत जवानांवर दगडफेक केली.

वाचा : VIDEO : गोडसे हा दहशतवादीच, ओवेसींकडून कमल हासनची पाठराखण

बारामुल्लातील मिरगुंड, चैनाबल, हरनाथ, सिंघपोरा, झील ब्रिज, कृपालपुरा पयीन आणि हांजीवेरा परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान 47 जवान जखमी झाले आहेत. या घटनेविरोधात स्थानिकांनी रॅली काढून आपला तीव्र निषेध व्यक्त केला. यामुळे कारगिल शहरात बंदचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या कुटुंबीयांना गाव सोडून जाण्यास सांगितलं आहे. या संतापजनक घटनेनंतर लोकांच्या मनात प्रचंड राग आहे, त्यामुळे त्यांना गाव सोडण्याचा सल्ला दिला गेला आहे.

वाचा :'मोदींना हटवून दाखवा...अडवाणींनी वाजपेयींना दिली होती धमकी'

Loading...चिमुकलीवर बलात्कार, खोऱ्यात तणाव

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे वृत्त समोर आले. मुलीला च्युईंगम देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्याच एका मुलानं तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. बराच वेळ ओलांडूनही मुलगी घरी न परतल्यानं आई-वडील तिचा शोध घेऊ लागले. जेव्हा शोध घेत-घेत तिची आई परिसरातील सरकारी शाळेजवळ पोहोचली, तेव्हा त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शाळेच्या आत जाऊन शोध घेतला असता त्यांना आपली मुलगी टॉयलेटमध्ये आढळून आली. तिच्या शरीर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून आले. यादरम्यान, आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती तिच्या आईवडिलांना समजली. पीडित मुलीनं आरोपीला ओळखलं. सुंबलमध्ये तो कार मेकॅनिकचं काम करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

VIDEO : गोडसे हा दहशतवादीच, ओवेसींकडून कमल हासनची पाठराखण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...