अमानुषतेचा कळस! दिव्यांग मुलीवर गँगरेप आणि नंतर तिचे डोळेही फोडले

अमानुषतेचा कळस! दिव्यांग मुलीवर गँगरेप आणि नंतर तिचे डोळेही फोडले

घटनेची बातमी वाचूनही अंगावर काटा येईल, असा हा प्रकार आहे. आतापर्यंत हे कळलेलं नाही की पीडितेने आपल्या डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गमावली की नाही. सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. तिची अवस्था गंभीर आहे.

  • Share this:

पाटणा, 13 जानेवारी : क्रूरतेचा कळस वाटावा असा भयंकर प्रकार बिहारमध्ये घडला आहे. घटनेची बातमी वाचूनही अंगावर काटा येईल, असा हा प्रकार आहे. एका अपंग मुलीवर आधी बलात्कार करून नंतर तिचे डोळे धारदार शस्त्राने फोडण्यात आले. बिहार पोलिसांनी बुधवारी सांगितलं, की राज्याच्या मधुबनी जिल्ह्यात (Madhubani District) एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर (minor physically challanged girl) गँगरेप (gang rape) झाला. आणि तिचे डोळेही (eyes) धारदार हत्यारानं फोडण्यात आले.

आतापर्यंत हे कळलेलं नाही की पीडितेने आपल्या डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गमावली की नाही. सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. तिची अवस्था गंभीर आहे.

पीडिता आपल्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन जात होती तेव्हाच आरोपींनी तिला जबरदस्ती उचलून नेत हे कृत्य केलं. बिहारच्या राजगीर इथूनसुद्धा एका अल्पवयीन मुलीच्या गँगरेपचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात कोर्टानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी (police) या प्रकरणात सात तरुणांना अटक केली आहे. पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 16 सप्टेंबर 2019 मध्ये ही घटना घडली होती. पीडित मुलगी घरून क्लासला निघाली होती. रस्त्यात आरोपींनी तिच्यावर अचानक हल्ला केला. पीडित मुलीची मेडिकल टेस्ट झाली. शिवाय तिनं न्यायाधीशांसमोर स्टेटमेंटही दिलं.

या घटनेचा व्हीडिओ समोर आल्यावर लोकांमध्ये बरीच अस्वस्थता निर्माण झाली. ही घटना घडताना पीडित मुलीनं वारंवार आरोपींकडे दयेची याचना केली. मात्र या क्रूर लोकांनी तिला सोडलं नाही. आरोपींवर पीडितेला धमकावण्याची केसही दाखल केली गेली आहे. व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींची ओळख लवकरच पटवण्यात आली. कारण सगळेच आरोपी स्थानिक होते.

बेगुसराय इथेही बछवारा ठाणे क्षेत्रात रसीदपूर इथं एका मोठ्या भावानं लहान भावाच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. नंतर तिनं स्वतःही विष खाऊन जीव दिला. मृत महिलेचं नाव देवी असून तिचं वय 35 वर्ष होतं. मृत पुरुषाचं नाव राम सोगारथ पासवान असं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 8:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading