अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचे खटले 2 महिन्यांत निकालात काढणार, मोदी सरकारची घोषणा

अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचे खटले 2 महिन्यांत निकालात काढणार, मोदी सरकारची घोषणा

हैदराबादमधलं सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर आरोपींचं झालेलं एन्काउंटर यामुळे देश हादरून गेला. त्यानंतर उन्नावमधल्या बलात्कार प्रकरणात पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनानंतर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : महिलांवरच्या वाढच्या अत्याचारांना लगाम घालण्यासाठी मोदी सरकार पूर्ण अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. देशामध्ये आणखी नवे फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याची सरकारची योजना आहे. बलात्काराच्या खटल्यात लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे केलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अल्पवयीन मुलींवरच्या बलात्कार खटल्यांचा निकाल 2 महिन्यांतच लावला जाईल, असं सरकारने म्हटलंय.

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने देशात 1 हजार 23 फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या देशात 704 फास्ट ट्रॅक कोर्ट चालवली जातायत. सगळ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि हायर्कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना मी यासंबंधी पत्र लिहिणार आहे, असंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

हैदराबादमधलं सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर आरोपींचं झालेलं एन्काउंटर यामुळे देश हादरून गेला. त्यानंतर उन्नावमधल्या बलात्कार प्रकरणात पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनानंतर रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.

(हेही वाचा : सिंचन घोटाळ्यात भाजपने अजित पवारांना क्लीन चिट दिली का? फडणवीस यांचा खुलासा)

हैदराबादमधलं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. गेली 7 वर्षं कोर्टात खेटे घालूनही आम्हाला अजूनही या प्रकरणी न्याय मिळालेला नाही, अशी भावना निर्भयाच्या आईनेही व्यक्त केली होती. त्यामुळेच या प्रकरणातल्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, अशी सगळ्यांची मागणी आहे.

=============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 7, 2019, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading