आसारामचा मुलगा नारायण साईला बलात्कार प्रकरणी जन्मठेप, 1 लाखांचा दंड!

आसारामचा मुलगा नारायण साईला बलात्कार प्रकरणी जन्मठेप, 1 लाखांचा दंड!

आसारामचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणी सुरत येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

सुरत, 30 एप्रिल: आसारामचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणी सुरत येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नायारणला एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. न्यायालयाने नारायण साईला 27 एप्रिल रोजी दोषी ठरवले होते.साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी नारायण साईवर सुरत कोर्टात खटला सुरु होता. या प्रकरणी नारायण साईची साथीदार साधिका गंगा जमना हिला 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. नारायणवर सुरतमध्ये राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. संबंधित महिलेने ऑक्टोबर 2013मध्ये नारायण विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधील पीपली येथून अटक केली होती. खटल्याच्या सुनावणी दरम्यान 53 जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

पीडित महिलेवर टाकला होता दबाव

संबंधित पिडित महिला नारायण साईच्या आश्रमात साधिका होती. या महिलेने नारायणवर आश्रमातच बलात्कार केल्याचा आरोप केला होता. नारायण साईने महिलेला आणि तिच्या वडिलांना तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. तक्रार मागे न घेतल्यास जीव घेण्याची धमकी दिली होती.

DCPला दिली होती धमकी

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुरतच्या डीसीपी शोभा भूतडा यांना ऑक्टोबर 2013मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली होती. नारायण साईच्या एका समर्थकाने फोनवरून डीसीपी शोभा यांनी धमकी दिली होती.

आसाराम देखील तुरुंगात

नारायण साईचा वडील आसाराम बापू देखील बलात्कार प्रकरणी दोषी ठरला आहे. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. जोधपुरच्या विशेष न्यायालयाने 25 एप्रिल 2018 रोजी आसारामला दोषी ठरवले होते.


VIDEO: असा षटकार मारा की मोदी देशाबाहेर जातील- नवज्योत सिंग सिद्धू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rape case
First Published: Apr 30, 2019 05:37 PM IST

ताज्या बातम्या