अल्पवयीन मुलीचा बलात्काराला प्रतिकार; नराधमांचा अ‍ॅसिड हल्ला

अल्पवयीन मुलीचा बलात्काराला प्रतिकार; नराधमांचा अ‍ॅसिड हल्ला

पाटणामध्ये घडलेल्या या घटनेनं बिहार राज्य हादरून गेलं आहे.

  • Share this:

पाटणा, 20 एप्रिल : बिहारमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बिहारमध्ये घडलेली घटना वाचल्यानंतर तुम्हाला प्रंचड चीड येईल, शिवाय, तुमच्या तळपायाची आग मस्तकात देखील जाईल. कारण, बिहारमधील पाटणा येथे नराधमांनी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौघांनी पीडितेच्या आईला बंदुकीचा धाक दाखवला. पण, त्यानंतर देखील अल्पवयीन मुलीनं प्रतिकार केला. दरम्यान, नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला केला.पीडित मुलगी ही अकरावीध्ये शिकत आहे.

सध्या या मुलीवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, महिला सुरक्षेचा मुद्दा देखील आता ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी केस दाखल केली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तर, आत्तापर्यंत दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे.

VIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...

First Published: Apr 20, 2019 05:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading