Home /News /national /

'आईला कमजोर समजू नका', पिल्लांसाठी मादी अस्वल भिडली वाघासोबत

'आईला कमजोर समजू नका', पिल्लांसाठी मादी अस्वल भिडली वाघासोबत

आदित्य सिंह या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात मादी अस्वल आणि वाघामध्ये झालेल्या झटापटीचे काही फोटो कैद झाले आहेत. राजस्थानच्या (Rajsthan) रणथंबोर अभयारण्यामधील (Ranthambore National Park) ही दृश्य आहे. आपल्या मुलांवर एखादं संकट आलं तर आई मृत्यूलाही सामोरं जाऊ शकते, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

पुढे वाचा ...
    जयपूर, 9 फेब्रुवारी : राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. याठिकाणची दृश्य नेहमीच टिपण्यासारखी असतात. काही वेळा कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण मात्र अचंबित करणारे असतात. सवाई माधोपूर (Sawai Madhopur) या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या रणथंबोर अभयारण्यातील असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाघ आणि मादी अस्वलामधील झटापटीचे काही क्षण एका फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सफारी ऑपरेटर आणि फोटोग्राफर असणाऱ्या आदित्य सिंह यांनी हे काही रंजक फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवर आदित्य सिंह यांनी वाघ आणि मादी अस्वलामधील झटापटीचे फोटो शेअर केले आहेत. ‘आईला कधी कमजोर नाही समजलं पाहिजे’ असं कॅप्शन देत आदित्य सिंह यांनी वाघ आणि मादी अस्वलातील झटापटीच्या फोटो सिरीज शेअर केली आहे. प्रत्येक फोटोमधून त्यांनी नेमकं काय घडलं याची कहाणी सांगितली आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी या मादी अस्वलाने वाघाशी दोन हात केले. आपण फोटोमध्ये पाहू शकतो की कशाप्रकारे वाघ मादी अस्वल आणि तिच्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी सरसावरला. मात्र जेव्हा आपल्या पिल्लांचा जीव संकटात आहे हे लक्षात येताच ती पाय रोऊन उभी राहिली. तिचा आवेश पाहून मग वाघही नरमला आणि पसार झाला. आदित्य सिंह या फोटोग्राफरने आपल्या कॅप्शनमध्ये लिहल्याप्रमाणे खरंच ‘आईला कधी कमजोर समजू नये’.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या