रंजन गोगोईंविरोधात राज्यसभेत शेम-शेमचे नारे, दिलं असं प्रत्युत्तर सर्वजण पाहत राहिले

रंजन गोगोईंविरोधात राज्यसभेत शेम-शेमचे नारे, दिलं असं प्रत्युत्तर सर्वजण पाहत राहिले

माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi)) यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत शेम-शेमच्या घोषणा दिल्या. यावेळी रंजन गोगोई यांनी दिलेलं उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच गाजत आहे.

जेव्हा त्यांना विरोध करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, 'लवकरच ते माझं स्वागत करतील'. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून अनेकांनी त्यांचा कौतुक केलं. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गोगोई यांच्या नियुक्तीला न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर हल्ला म्हणत टीका केली जात आहे. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील सदस्यपदासाठी गोगोईंचे नाव ठरविले होते.

हे वाचा - 'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो...', असं सांगत राज ठाकरे यांनी केलं आवाहन

देशातील माजी मुख्य न्यायाधीश (CJI) रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेत काँग्रेससह विविध विरोधी सदस्यांच्या गोंगाटात शपथ घेतली. काँग्रेससह इतर सदस्यांनी याचा निषेध केला आणि सभागृहाबाहेर गेले. वरिष्ठ सभागृहाची कार्यवाही सुरू होताच गोगोई शपथविधीसाठी नेमलेल्या जागेवर पोहोचताच विरोधी सदस्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या गोंधळावर आक्षेप घेताना सभापती एम. वेंकय्या नायडू म्हणाले की, आपल्याला सदस्यांचा सन्मान करायला हवा, असं वर्तन योग्य नाही.

गोगोई यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. शपथ घेतल्यावर त्यांनी सभापती व इतर सदस्यांना शुभेच्छा दिल्या. सभेत झालेल्या गोंधळावर अध्यक्ष नायडू म्हणाले, "घटनात्मक तरतुदी तुम्हाला ठाऊक आहेत, तुम्हाला उदाहरणे माहीत आहेत. आपल्याला राष्ट्रपतींचे हक्क माहीत आहेत." असं नायडू म्हणाले. आपण सभागृहाबाहेर कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करण्यास मोकळे आहात. मात्र सभागृहात गोंधळ घालणं बरं नव्हे. "

कायदेमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, विरोधी सदस्यांचे आचरण पूर्णपणे अनुचित आहे..

हे वाचा - इतर देशांच्या तुलनेत भारतात 'कोरोना'चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या

नायडू म्हणाले, "आपण सदस्याचा आदर केला पाहिजे. सभागृहात कामकाज सुरू करण्यापूर्वी बऱ्याच सदस्यांनी गोगोई यांचे अभिनंदन केले. ते सभागृहात मनोनीत सदस्य सोनल मान सिंह यांच्या शेजारी बसले होते.

First published: March 19, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या