भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत राणेंचा भाजप प्रवेश नाही,दानवेंकडून स्पष्टीकरण

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत राणेंचा भाजप प्रवेश नाही,दानवेंकडून स्पष्टीकरण

राणेंना भाजप प्रवेश देऊन त्यांना कार्यकारणी सदस्य केलं जाईल, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. पण या बैठकीत राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

  • Share this:

24 सप्टेंबर : राणेंना भाजप प्रवेश देऊन त्यांना कार्यकारणी सदस्य केलं जाईल, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. पण या बैठकीत राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

नारायण राणे सोमवारी दिल्लीत अमित शाह यांना भेटायला येण्याचे संकेत यापूर्वी नारायण राणे यांनी दिले होते. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता वाढली होती.

दरम्यान, भाजपात जायचं की नाही, याचा निर्णय अजून मी घेतलेला नाही, पण यावेळी नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेने जायचं, यासंबंधीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. असं सडेतोड मत नारायण राणेंनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत मांडलंय. विधान परिषदेच्या गटनेतेपदासाठी अशोक चव्हाणांनी मला डावलल्यामुळेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

नारायण राणेंनी या मुलाखतीत काँग्रेस नेत्यांवर टीका करतानाच भाजप नेत्यांचं जाहीर कौतुकही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तुत्ववान नेते आहेत. त्यांच्यामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सलग 3 वर्षे मुख्यमंत्री सांभाळून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. तर नितीन गडकरी आणि माझ्यातरी मैत्री ही राजकारणापलीकडची आहे, असंही राणेंनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...